Sri Lanka vs India Twitter
क्रीडा

SL vs IND : श्रीलंकेसमोर 227 धावांचे टार्गेट

मोराठमोळ्या ऋतूराजला टी-20 मालिकेपर्यंत प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

सुशांत जाधव

Sri Lanka vs India 3rd ODI : भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने मालिका आधीच खिशात घातलीये. अखेरच्या सामन्यात गोलंदाजीसह फलंदाजीत बदल करण्यात आले आहेत. ईशान किशनच्या जागी संजू सॅमसनची संघात वर्णी लागली आहे. याशिवाय कृष्णाप्पा गौथम, राहुल चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया या युवांना संधी मिळाली आहे. मोराठमोळ्या ऋतूराजला टी-20 मालिकेपर्यंत प्रतिक्षाच करावी लागणार आहे. (Sri Lanka vs India 3rd ODI Live Cricket Score Update India Win Toss And bat First Final Result)

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या जोडीने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 28 धावा असताना कर्णधार शिखर धवन 11 चेंडूत 13 धावा करुन माघारी फिरला. चमीराने भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि संजू सॅमसन यांनी भारतीय डाव सावरला. अर्धशतकाला अवघी एका धाव कमी असताना पृथ्वी शॉ बाद झाला. शनाकाने त्याला पायचित केले. 46 चेंडूत 46 धावा करणाऱ्या संजूला जयविक्रमाने तंबूत धाडले. भारतीय संघाने 23 षटकात 147 धावा केल्या असताना पावसाने बॅटिंग सुरु केली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला होता.

त्यानंतर पावसाच्या व्यत्यामुळे सामना प्रत्येकी 47-47 षटकांचा करण्यात आला. मनिष पांडे 19 चेंडूत 11 धावा करुन माघारी फिरला. सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत 40 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्या 19(17), राहुल चाहर 13(25), नवदीप सैनी 15(37) धावांच्या जोरावर भारतीय संघाचा डाव 43.1 षटकात 225 धावांत आटोपला. डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेला 227 धावांचे टार्गेट मिळाले आहे.

भारतीय प्लेइंग इलेव्हन : पृथ्वी शॉ, शिखर धवन (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मनिष पांडे, सूर्यकुमार यादव, नितीश राणा, हार्दिक पांड्या, कृष्णाप्पा गौथम, राहुल चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT