SL vs PAK : पाकिस्तानने श्रीलंकेविरूद्धच्या (Sri Lanka Vs Pakistan) पहिल्या कसोटी सामन्यात 4 विकेट राखून विजय मिळवला. पाकिस्तानने चौथ्या डावात 342 धावांचे आव्हान पार केले. या विजयाचा शिल्पकार सलामीला येत नाबाद 160 धावांची खेळी करणारा अब्दुल्ला शफिक (Abdullah Shafique) ठरला. सामना जिंकून देणारी खेळी करणारा अब्दुल्ला आता भारताचे दिग्गत माजी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे.
पाकिस्तानच्या अब्दुल्ला शफीकचा हा 6 वा कसोटी सामना होता. त्यात त्यांनी 80 च्या सरासरीने 720 धावा केल्या आहेत. यानंतर तो 6 कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानच्या जावेद मियांदाद यांना देखील मागे टाकले आहे. अब्दुल्ला 6 कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आता चौथ्या स्थानावर आहे. या यादीत सुनिल गावसकर हे 912 धावा करून अव्वल स्थानावर आहेत.
चौथ्या डावत 400 पेक्षा जास्त चेंडूंचा सामना
शफीक अथर्टन, सटक्लिफ, गावसकर आणि बाबर आजम यांच्यानंतर कसोटीच्या चौथ्या डावात 400 पेक्षा जास्त चेडूंचा सामना करणारा 5 वा फलंदाज ठरला.
आशियातील कसोटी सामन्यात चौथ्या डावात यशस्वी धावांचा पाठलाग करताना अब्दुल्लाने 160 धावा केल्या होत्या. हा आशियातील कसोटी सामन्यात चौथ्या डावात केलेला तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा होत्या. यापूर्वी काईल मेयर्सने बांगलादेश विरूद्ध नाबाद 210 धावा तर श्रीलंकेविरूद्ध युनिस खानने नाबाद 171 धावा केल्या होत्या.
500 पेक्षा जास्त मिनिटे खेळपट्टीवर
अब्दुल्ला कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी धावांचा पाठलाग करताना 500 मिनिटांपेक्षा जास्त काळ खेळपट्टीवर घालवणारा पहिला फलंदाज ठरला. तो खेळपट्टीवर 524 मिनिटे खेळत होता.
नाबाद परतलेला फलंदाज
चौथ्या डावात 300 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना अब्दुल्ला नाबाद राहिला होता. अशी कामगिरी करणारा तो वेस्ट इंडीजच्या गॉर्डन ग्रीनिज यांच्यानंतरचा दुसराच फलंदाज ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.