सीएसकेचा अनुभवी खेळाडू अंबाती रायडूने दोनदिवसांपूर्वी, 'माझी ही आयपीएल अखेरची आहे असे सांगणारे ट्विट करत निवृत्ती घेत असल्याचे जाहिर केले. त्यानंतर काही तासांतच ते ट्विट डिलीट केले.' त्याच्या गोंधळावर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, क्रिकेट जगतात त्याच्या निवृत्तीची चर्चा अधिक रंगली आहे.
36 वर्षीय रायडू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी त्याच्या धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या त्याची कामगिरी निराशजनक सुरु आहे. अशातच त्याने निवृत्तीचे ट्विट केले आणि काही तासांतच ते डिलीट केले. त्याचा हा गोंधळ पाहून सर्वजन चांगलेच गोंधळले. नेमकं त्याला काय म्हणायचं आहे. असा सवाल उपस्थित करण्यात आला.
अशातच त्याच्या निवृत्तीवर संघाचे सीईओनंतर आता कोच फ्लेमिंग यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रायडूच्या निवृत्तीसंदर्भात सवाल उपस्थित करण्यात आला.
यावेळी ते म्हणाले, 'खरंतर हे निराशजनक नाही. प्रामाणिपणे सांगायचं झालं तर हे तर चहाच्या कपातलं वादळ होत. मला वाटतं की तो बरोबर होता. त्याच्या या ट्विटमुळे सरावामध्ये कोणताही बदल झालेला नाही.' अशी प्रतिक्रीया कोच फ्लेमिंग यांनी वक्त केली आहे.
फ्लेमिंग यांच्यापूर्वी संघाचे सीईओ सध्या त्याला चांगली खेळी खेळता येत नसल्याने भावनेच्या भरातून त्याने हे ट्विट केले असावे. असे सांगत तो नेहमी सीएसके संघाबरोबरच खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
काल झालेल्या गुजरातविरुद्ध टायटन्स सामन्यात अंबाती रायडूला वगळण्यात आले होते. त्याने या सीझनमध्ये आत्तापर्यंत 12 मॅच खेळले आहेत. 10 डावांत त्याने 27.10 सरासरीने 271 धावा केल्या आहेत. त्याने एक अर्धशतकही झळकावले आहे.
रायडूने काय म्हटले होते ट्विटमध्ये?
मी जाहिर करत आहे की ही माझी अखेरची आयपीएल असेल. गेली 13 वर्ष मी आयपीएलमध्ये खेळत आहेत. 2 महान संघासोबत खेळण्याचा आनंद काही वेगळाच होता. अप्रतिम प्रवासासाठी मुंबई इंडियन्स आणि सीएसके यांचे मनापासून आभार मानायला आवडेल. अशी भावना रायुडूने ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.