Steve Smith David Warner Business esakal
क्रीडा

Steve Smith Business : स्मिथने 54 कोटींचे केले 101 कोटी! वॉर्नरही उतरणार याच व्यवसायात?

अनिरुद्ध संकपाळ

Steve Smith David Warner Net Worth Business : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपची गदा पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलिया आता इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना हा 16 जून पासून बर्मिंगहम येथील एजबस्टन मैदानावर सुरू होत आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 पासून पाहता येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्स करत असून या मालिकेत स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर विशेष लक्ष असणार आहे.

स्मिथ हा जबरदस्त फॉर्ममध्ये असून डेव्हिड वॉर्नरची बहुदा ही शेवटची अ‍ॅशेस मालिका असणार आहे. वॉर्नर आपली दीर्घ कारकीर्द लवकरच संपवणार असल्याची चर्चा सुरू आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स हे ऑस्ट्रेलियाचे दर्जेदार खेळाडूंचे जरी अर्धे आयुष्य हे क्रिकेटच्या मैदानात गेले असले तरी त्यांनी ते इतर व्यवसायातून देखील बक्कळ कमाई करतात.

डेली मेल ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स हे क्रिकेटव्यतिरिक्त रिअल इस्टेटमधूनही चांगली कमाई करतात.

स्मिथने 54 कोटींचे केले 101 कोटी

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि त्याची पत्नी डेनी विलिस यांनी सिडीनतील उपनगर वाक्लूस (Vaucluse) यथे 6.6 मिलियन डॉलरमध्ये (जवळपास 54 कोटी रूपये) एक घर खरेदी केले. दोन वर्षांनी त्यांनी ते घर विकले. हे घर त्यांनी 12 मिलियन डॉलरमध्ये (जवळपास 101 कोटी रूपये) विकले.

नाईन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार स्मिथच्या या घरात एक स्विमिंग पूल, एटरटेनमेंट टेरेस, डायनिंग हॉल, एक बार आणि मेम्स रूम देखील आहेत. तर बेसमेंटमध्ये एक थिएटर रूम देखील आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डनुसार स्मिथ हा गेल्या दशकभरापासून रिअल इस्टेटच्या व्यवसायात आहे. तो प्रॉपर्टी व्यवसायातून एका आठवड्यात हजारो डॉलर्स कमवतो. बिग अॅप्पलसाठी स्मिथचे प्रेम हे जगजाहीर आहे.

पॅट कमिन्सची इंटिरियर डिझायनर पत्नी

स्टीव्ह स्मिथ सारखं पॅट कमिन्स देखील रिअल इस्टेटमध्ये कार्यरत आहे. कमिन्स आणि इंटिरियर डिझायनर पत्नी बेकी बोस्टनने मिळून 9.5 मिलियनमध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी ते विकून चांगला नफा कमावला. सिडनीचे उपनगर ब्रोंटे येथील 670 स्क्वेअर मीटरचे एक घर घेतले होते. त्यात 5 बेडरूम, एक मोठे बॅक यार्ड आणि स्विमिंग पूल आहे.

कमिन्स आणि बेकी हे 2020 पर्यंत या घरात रहात होते. कमिन्सने 2019 मध्ये 7.5 कोटी रूपयाला एक कॉटेज खरेदी केले होते. तर 2013 मध्ये 1.3 मिलियनमध्ये क्लोवेली येथे एक तीन बेडरूमची अपार्टमेंट देखील खरेदी केली होती. कमिन्स आणि बेकी यांनी गेल्या वर्षी लग्न केले.

डेव्हिड वॉर्नर देखील रिअल इस्टेटमध्ये हात आजमावणार

डेव्हिड वॉर्नरने फॉक्स स्पोर्टसोबत समालोचनाबाबतचा एक करार केला आहे. वॉर्नरने व्यावसायिक क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो इतर व्यवसायात आपला हात आजमावणार आहे. वॉर्नर देखील कमिन्स आणि स्मिथ सारखं रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतोय. गेल्या वर्षी मे महिन्यात वॉर्नर आणि कँडी तीन मुलींसह सिडनी येथील मारॉब्रा येथील आपल्या 4 मिलियन डॉलर्सच्या महालात रहायला गेला आहे. वॉर्नरने ही 892 स्क्वेअर मिटरची प्रॉपर्टी 2015 मध्ये खरेदी केली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT