Steve Smith Stuck In Lift esakal
क्रीडा

स्मिथ अडकला लिफ्टमध्ये, लॅम्बुशग्नेचे प्रयत्नही पडले अपुरे

अनिरुद्ध संकपाळ

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) जवळपास तासभर लिफ्टमध्ये अडकला होता. याबाबतची माहिती खुद्द स्टीव्ह स्मिथने इन्स्टाग्रावर पोस्ट (Instagram Post) करत दिली. स्मिथने सांगितले की तो लिफ्टमध्ये अडकला होता. लिफ्टचा दरवाजाच उघडत नव्हता. स्मिथ म्हणाला, ती लिफ्ट बहुदा वापरात नव्हती. (Steve Smith Stuck In Lift)

ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षाचा अव्वल फलंदाज स्टीव्ह स्मिथने सांगितले की, लिफ्टमध्ये अडकल्यानंतर तो लिफ्टचा दरवाजा आतून उघडण्याचा प्रयत्न करत होता. तर मार्नस लॅम्बुशग्ने (Marnus Labuschagne) बाहेरून लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. पण, सर्व प्रयत्न करुनही दरवाजा उघडत नव्हता. त्यामुळे माझी संध्याकाळ जशी ठरवली होती तशी गेली नाही.

स्मिथ पुढे म्हणाला, मी माझी रुम असलेल्या मजल्यापर्यंत पोहचलो होतो. मात्र लिफ्टचा दरवाजा उघडतच नव्हता. लिफ्ट वर आल्यानंतर बंद पडली होती. मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होतो. मला थोडा दरवाजा उघडण्यात यश आले. दुसरीकडे बाहेरून मार्नस लॅम्बुशग्ने (Marnus Labuschagne) दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र काही झाले नाही. माझी सर्व संध्याकाळ वाया गेली.'

'मी आता खाली बसतो. तुम्ही लिफ्टमध्ये अडकल्यानंतर दुसरे काय करणार? मला वाटते मी इथे बराच वेळ असणार आहे. त्यामुळे काय करावं याबद्दल तुम्ही मला सल्ला देऊ शकता.' असे स्मिथ आपल्या इन्स्टाग्राम उकाऊंटवर (Instagram) केलेल्या पोस्टमध्ये म्हणाला.

दरम्यान, मार्नस लॅम्बुशग्ने बाहेरून लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र यश आले नाही. लॅम्बुशग्नेने आत अकडकलेल्या स्मिथला दरवाजाच्या फटीतून चॉकलेटही दिले. काही वेळाने लिफ्ट ऑपरेटर आला आणि त्याने स्टीव्ह स्मिथला लिफ्टमधून बाहेर काढले. जवळपास तासाभराने स्मिथ बाहेर आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT