Stuart Broad esakal
क्रीडा

लग्नआधीच क्रिकेटर स्टुअर्ट ब्रॉड होणार डॅडी, फोटो शेअर करत दिली Good News

धनश्री ओतारी

इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्याने होणारी पत्नी मॉली किंगसोबतचा (Stuart Broad Wife Mollie King) एक फोटो शेअर करून ही चाहत्यांना लवकरच बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे.

स्टुअर्ट ब्रॉडची होणारी मॉली किंगने स्टुअर्ट ब्रॉडसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. बेबी बंपमध्ये मॉली किंग दिसत आहे, तर पती ब्रॉड गुडघ्यावर बसून बेबी बंपला किस करताना दिसत आहे. या माहितीनंतर क्रिकेट जगतातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

स्टुअर्ट ब्रॉड आणि मॉली किंग यांचे हे पहिले अपत्य असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की मॉली ही पहिली रेडिओ 1 प्रेझेंटर होती. मॉली किंग 35 वर्षांची आहे. मॉली किंग आणि स्टुअर्ट ब्रॉड यांची 2021 च्या सुरुवातीला साखरपुडा झाला आहे. मात्र, दोघांनी अद्याप लग्नगाठ बांधलेली नाही. गेल्यावर्षी स्टुअर्ट ब्रॉड लग्नबंधानात अडकणार होता पण काही कारणास्तल ते पुढे ढकलण्यात आले.

स्टुअर्ट ब्रॉड उद्या आपला ३६ वा वाढदिवस साजरा करणार आहे. ब्रॉडने 2006 मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो अजूनही कसोटी संघात महत्त्वाची भूमिका बजावतो. बातमी लिहिल्यापर्यंत, ब्रॉडने 154 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 56 टी-20 सामने खेळले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने अनुक्रमे ५४६, १७८ आणि ६५ विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT