Paris Olympics sakal
क्रीडा

Paris Olympics : मनू, विजयवीरचा अचूक निशाणा ; पॅरिस ऑलिंपिक निवड चाचणीत यश

मनू भाकेर व विजयवीर सिद्धू या दोन नेमबाजांनी पॅरिस ऑलिंपिकसाठीच्या निवड चाचणीत यश मिळवले. मनू हिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ४२ गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मनू भाकेर व विजयवीर सिद्धू या दोन नेमबाजांनी पॅरिस ऑलिंपिकसाठीच्या निवड चाचणीत यश मिळवले. मनू हिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ४२ गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. मनूने याप्रसंगी विक्रमी गुणसंख्या मिळवली. विजयवीर याने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात ३४ गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. ऑलिंपिक पात्रतेसाठी ही अखेरची स्पर्धा होती. आता उद्यापासून ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारच्या पात्रता फेरींना सुरुवात होणार आहे.

मनू भाकेर हिने महिलांची २५ मीटर पिस्तूल प्रकारच्या चारही पात्रता फेरी गाजवल्या. तिने दोन पात्रता फेरींमध्ये पहिले स्थान पटकावले. तसेच इतर दोन पात्रता फेरींमध्ये तिने दुसरा क्रमांक मिळवला. तसेच निवडण्यात आलेल्या पाच महिला नेमबाजांमध्ये ती एकुलती एक अशी नेमबाज आहे की, पात्रता प्राथमिक फेरीत ५८० गुणांपेक्षा कमी गुण मिळवलेले नाही. मनू हिने चारही प्राथमिक फेरीत ५८० पेक्षा जास्त गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमधील तिचा प्रवेश नक्की समजला जात आहे.

अभिज्ञा पाटीलचा दुसरा क्रमांक

मनू भाकेर हिने पहिला क्रमांक मिळवला. त्याच २५ मीटर पिस्तूल प्रकारात अभिज्ञा पाटील हिने ३५ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. सिमरनप्रीत कौर ३० गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. इशा सिंग व रिदम सांगवान यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला.

पुरुषांमध्ये रस्सीखेच

चार पात्रता फेरींमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या नेमबाजांची ऑलिंपिकसाठी निवड केली जाते. महिलांमध्ये मनू भाकेर व इशा सिंग यांनी अप्रतिम कामगिरी करीत जवळपास आपले तिकीट बुक केले आहे; पण पुरुषांमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. अनिश याने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारातील दोन पात्रता फेरी जिंकल्या असून इतर दोन पात्रता फेऱ्यांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. भावेश शेखावत याने एक पात्रता फेरी जिंकली आहे. विजयवीर याने शेवटच्या पात्रता फेरीत विजय मिळवला असून इतर दोन पात्रता फेरींमध्ये तो दुसऱ्या स्थानी राहिला आहे.

महिला विभागातील निकाल

  • (२५ मीटर पिस्तूल)

  • १) मनू भाकेर - ४२ गुण

  • २) अभिज्ञा पाटील - ३५ गुण

  • ३) सिमरनप्रीत कौर - ३० गुण

  • पुरुष विभागातील निकाल

  • (२५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल)

  • १) विजयवीर सिद्धू - ३४ गुण

  • २) अनीश - ३० गुण

  • ३) आदर्श सिंग - २५ गुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT