Sumit Nagal Reached Monte Carlo Main Draw Create History esakal
क्रीडा

Sumit Nagal : सुमित नागलनं इतिहास रचला, Monte Carlo Masters मध्ये प्रत्येक फेरीनंतर कमवतोय बक्कळ पैसे

अनिरुद्ध संकपाळ

Sumit Nagal Reached Monte Carlo Main Draw Create History : भारताचा पुरूष एकेरीतील टेनिसपटू सुमित नागलने इतिहास रचला. आज तो माँटे कार्लो मास्टर्सच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवणारा तो 42 वर्षानंतरचा भारताचा पहिला टेनिसपटू ठरला. 91 व्या मानांकित सुमित नागलने अर्जेंटिनाच्या फाकुंडो डिआझ एकोस्टाचा तीन सेटमध्ये पराभव केला. त्याने सामना 7-5,2-6, 6-2 असा जिंकला.

गेल्या चार दशकात या स्पर्धेत एकाही भारतीय टेनिसपटूला मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवण्याची संधी मिळाली नव्हती. यापूवी 1982 मध्ये रमेश क्रिष्णन यांनी अशी कामगिरी केली होती. त्यांचा मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीतच पराभव झाला होता.

सुमित नागलने जागतिक क्रमवारीत 55 व्या स्थानावर असणाऱ्या अर्जेंटिनाच्या एकोस्टाला पराभूत करण्यापूर्वी पहिल्या पात्रता फेरीत फ्लाव्हिओ कोबीलीचा 6-2, 6-3 असा पराभव केला होता. आता त्याचा मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत अर्जेंटिनाच्याच फेडेरिको कोरिआसोबत सामना होणार आहे. तो जागतिक क्रमवारीत 103 व्या स्थानावर आहे.

विशेष म्हणजे नागलने इतिहास रचण्यासोबतच आता या स्पर्धेत जवळपास 20 लाख 78 हजार रूपये देखील कमवले आहेत. गेल्या जानेवारी महिन्यात नागलने ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीतपर्यंत धडक मारली होती. तेथे त्याने अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव केला होता. याचबरोबर नागलने इंडियन वेल्सच्या मख्य फेरीत देखील प्रवेश केला होता. तेथे त्याचा पहिल्याच फेरीत मिलोस राओनिकने पराभव केला होता.

(Tennis Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT