Sunil Chhetri Announced His Retirement sakal
क्रीडा

Suni Chhetri Retirement: 'माझी निवृत्ती महत्त्वाची नाही तर देशासाठी....' अखेरच्या सामना खेळण्यासाठी छेत्री उतरणार मैदानात

Kiran Mahanavar

India vs Kuwait World Cup Football : भारताचा सुपरस्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री आज आपला अखेरचा सामना खेळत आहे. विश्वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेत कुवेतविरुद्ध हा सामना होत आहे. माझी निवृत्ती महत्त्वाची नाही तर देशासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे, असे मत छेत्रीने या सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.

या सामन्यात विजय मिळवला तर भारताचा तिसऱ्या फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित होणार आहे. त्यामुळे भारताने विजय मिळवला तर ते मोठे यश असणार आहे; परंतु छेत्रीचा अखेरचा सामना म्हणून या सामन्याला एक वेगळेच वळण निर्माण झाले आहे.

संघातील आम्ही सर्व खेळाडू २० दिवसांपासून एकत्र आहोत. माझा हा अखेरचा सामना आहे याची प्रत्येकाला जाणीव आहे. आता त्यामुळे प्रत्येकाने मानसिकता तयार केली आहे. परिणामी, आम्ही आता केवळ कुवेतविरुद्धच्या या सामन्याचीच चर्चा करत आहोत, विजय कसा मिळवता येईल याची रणनीती तयार करत आहोत, असे छेत्रीने सांगितले. कृपया करून मला निवृत्तीबाबत सारखे विचारू नका, त्यामुळे आम्हाला पूर्णपणे खेळावर लक्ष केंद्रीत करता येईल, असेही आर्जव छेत्रीने प्रसिद्धी माध्यमांसमोर बुधवारी सरावाच्या वेळी केले.

तुम्हीच माझ्या निवृत्तीबाबत अधिक चर्चा करत आहोत. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये याबाबत बोलतही नाही. आम्ही सर्व जण तेच खेळाडू आहोत आणि सरावाच्या वेळी मजा मस्ती करत आहोत. कोणताही खेळाडू माझ्याकडे भावनिक नजरेने पाहात नाही, देशाचा विजय हेच आमचे एकमेव लक्ष्य आहे, असेही छेत्री म्हणाला.

आम्ही हा सामना कोलकतामध्ये खेळत आहोत हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्हाला तुफान पाठिंबा मिळणार आहे. परिणामी, आम्हाला अधिक जोमाने आणि आत्मविश्वासाने खेळ करता येणार आहे, असे छेत्रीने सांगितले.

आजचा सामना जिंकून भारताने पुढच्या फेरीत स्थान मिळवले तर निवृत्तीचा विचार बदलणार का, या प्रश्नावर छेत्री हसत हसत म्हणाला, माझी तयारी झाली आहे, मी प्रवासही करणार आहे; पण खेळाडू नव्हे तर भारतीय संघाचा पाठीराखा म्हणून खेळाडूंचा खेळ पाहण्यास जाणार आहे.

भारतासाठी कुवेतविरुद्धचा हा सामना महत्त्वाचा आहे. कमकुवत अफगाणिस्तानविरुद्ध मार्च महिन्यात झालेल्या सामन्यात १-२ असा पराभव झाल्यामुळे भारताला आता हा सामना जिंकणे अनिवार्य झाले आहे. कधी कधी माझ्याकडून चांगला खेळ होत नाही, कधी कधी लयबद्ध खेळ होतो; पण सर्वोत्तम प्रयत्न करण्यात मी कधीही कमी पडत नाही. आपला संघ तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरला आणि तेथे जपान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पाहणे माझे स्वप्न आहे, असेही छेत्रीने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT