Sunil Gavaskar  esakal
क्रीडा

Sunil Gavaskar : पोलिसांनी पुढच्यावेळी... सुनिल गावसकर तिरंग्यावर कंपनीचं नाव पाहून जाम भडकले

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar : भारताचे महान माजी फलंदाज सुनिल गावसकर भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या सामन्यादरम्यान जाम भडकले होते. त्यांनी एका कंपनीचे नाव तिरंग्यावर पाहिले अन् त्यांना राग अनावर झाला. हा असा झेंडा पाहिल्यानंतर त्यांच्याकडून श्रेयस अय्यरला प्रश्न देखील विाचण्याचं राहून गेलं.

श्रेयस अय्यरच्या बॅटिंगवर कडक प्रतिक्रिया दिल्यावर गावसकरांनी तिरंग्यावर कंपनीचा लोगो लावणाऱ्यांची चांगलाच खरडपट्टी काढली.

गावसकर यांनी अय्यरच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं मान्य केलं. अय्यर चांगली सुरूवात करतोय मात्र शेवटपर्यंत खेळत नाहीये. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केल्याने अय्यरचे कौतुक देखील गावसकरांनी केलं.

भारताने सेमी फायनलमधील आपले तिकीट नक्की केल्यानंतर अय्यरने इडन गार्डनवर दक्षिण अफ्रिकेविरूद्ध दमदार खेळी केली. त्याने आपली वर्ल्डकपमधील सरासरी (48.83) चांगली केली.

दरम्यान कार्यक्रमातून अय्यर गेल्यानंतर गावसकर यांनी ऑन एअर अय्यरला प्रश्न विचारण्यात ते असमर्थ का राहिले हे सांगितले. गावसकर म्हणाले की, होय मी प्रश्न विचारणार होतो. मात्र माझ लक्ष थोडं विचलित झालं. तिथं एक भारतीय ध्वज होता त्यावर एका कंपनीचे नाव लिहिले होते.

तुम्हाला माहिती आहेच की भारताच्या राष्टध्वजावर नाव लिहिण्याची परवानगी नाही. भारताच्या ध्वजाला कोणत्याही प्रकारे विद्रुप करता येत नाही.'

गावसकर पुढे म्हणाले की, माझं म्हणणं आहे की पोलीस पुढच्यावेळी असा काही प्रकार पाहतील त्यावेळी तो ध्वज फक्त जप्त न करता त्या लोकांना ताकीद देखील दिली पाहिजे. कोणीही झेंड्यावर जाहिरात, कंपनीचं नाव, उत्पादनाचं नाव लावू शकत नाही.'

'मला खेद आहे की मी थोडा विचलित झालो. मला माहिती आहे की रवीला वाटत होतं की मी श्रेयसला प्रश्न विचारावा मात्र मी फक्त त्या लोकांना पाहत होतो. मी त्यांना संकेत देण्याचा प्रयत्न करत होतो.'

भारताने 2023 च्या वर्ल्डकपमध्ये आपले आतापर्यंतचे आपले 8 पैकी 8 सामने जिंकले आहेत. ते सध्या गुणतालिकेत 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. भारताचा पुढचा सामना हा नेदरलँड्सविरूद्ध 12 नोव्हेंबरला होणार आहे. भारत सेमी फायनलमध्ये अव्वल स्थानासह पात्र झाल्याने आता त्यांचा चौथ्या क्रमांकाच्या संघासोबत 15 नोव्हेंबरला सामना होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT