Sunil Gavaskar KL Rahul All Round  esakal
क्रीडा

Sunil Gavaskar : सुनिल गावसकर म्हणाले, बांगलादेश दौऱ्यावर भारताला नवा 'ऑल राऊंडर' मिळाला

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Gavaskar KL Rahul : भारत सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. दौऱ्यावरील पहिल्याच वनडे सामन्यात बांगलादेशने भारताला एक विकेटने मात दिली. यानंतर भारतीय संघ कशा प्रकारे वनडे वर्ल्डकपसाठी आपली संघ बांधणी करणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामीवीर होते. आता वनडेमध्ये रोहित शर्माचा सलामीचा पार्टनर बदलला आहे. इतकेच नाही तर विकेट किपर देखील बदलला असून ती जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. या सर्व घडामोडींवर भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर यांनी देखील आपले मत व्यक्त केले.

सुनिल गावसकर म्हणाले की, 'ज्यावेळी रोहित शर्मा आणि शिखर धवन भारतासाठी सलामी आणि विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळत असतो त्यावेळी केएल राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. मला असे वाटते की तो संघात पाचव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून जागा मिळवू इच्छितो.'

गावसकरांनी केएल राहुलच्या विकेटकिपिंगबद्दल देखील मत व्यक्त केले. ते म्हणाले की, 'केएल राहुल भारताला एक अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देतोय. जर कोणी मधल्या फळीत फलंदाजी करत उपयुक्त विकेटकिपिंग देखील करत असेल तर तुम्हाला अजून एक अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याचा पर्याय मिळतो. मी राहुलला ऑल राऊंडर समजतो कारण तो विकेटकिपिंगही करतोय, तो सलामीला देखील फलंदाजी करू शकतो. तो पाचव्या क्रमांकावर देखील फलंदाजी करू शकतो. माझ्या दृष्टीने तो एक ऑल राऊंडर आहे. त्याच्यासारखी शॉट्सची रेंज असलेला खेळाडू तर पाचव्या सहाव्या स्थानावर फिनिशर म्हणून हवा असतो.'

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: विधानसभा निवडणुका जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा हा आहे 'मास्टर प्लॅन'; ठाण्यात नाही तर 'या' ठिकाणी ठोकणार तळ

SA vs IND: मी फार विचार केला, तर इमोशनल होईन; १० वर्ष मी वाट पाहिली! Sanju Samson ने मैदानासोबत मनंही जिंकली

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

Sakal Podcast: ‘TET’ परीक्षेवर राहणार ‘AI’ची नजर ते रश्‍दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावरील बंदी उठवली

SCROLL FOR NEXT