South Africa vs India T20 : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामधील रविवारचा टी-२० सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. एकही चेंडू या लढतीत टाकला गेला नाही. हाच धागा पकडून भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळावर टीका केली.
ते म्हणाले, दक्षिण आफ्रिकन मंडळाने कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमची प्रेरणा घ्यायला हवी. पावसाच्या व्यत्ययाचा ईडन गार्डनवरील सामन्यावर परिणाम होत नाही. तेथे संपूर्ण मैदान पावसापासून वाचवण्याची सुविधा आहे.
सुनील गावसकरांनी पुढे स्पष्ट मत व्यक्त करताना म्हटले, की प्रत्येक क्रिकेट मंडळाची आर्थिक क्षमता चांगली आहे. आम्हाला आर्थिक चणचण भासते असे कुणी म्हणत असेल तर ते नक्कीच खोटे बोलत आहेत. बीसीसीआयएवढी रक्कम इतर मंडळांना मिळत नसेल हे मान्य आहे, पण संपूर्ण मैदानासाठी कव्हर वापरण्यात यावे इतकी सुविधा ते नक्कीच करू शकतील.
इंग्लंड मंडळाकडूनही निराशा
सुनील गावसकरांनी २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडकातील लढतींवर दृष्टिक्षेप टाकला. ते म्हणाले, इंग्लंडमध्ये मागील एकदिवसीय विश्वकरंडक पार पडला त्या वेळी चार लढती पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकल्या नाहीत. यामुळे काही संघांचे नुकसान झाले. सामना झाला असता तर त्यांना गुणांची कमाई करता आली असती. पाऊस थांबल्यानंतरही लढती होऊ शकल्या नाहीत.
सौरव गांगुलीचे कौतुक
सुनील गावसकरांनी याप्रसंगी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचे कौतुक केले. ते सांगतात, पावसाच्या व्यत्ययामुळे ईडन गार्डनवरील एक सामना रद्द झाला. त्यानंतर सौरव गांगुलीकडून अव्वल दर्जाचे व्यवस्थापन करण्यात आले. संपूर्ण मैदान झाकले जाईल अशी सुविधा तेथे निर्माण करण्यात आली. त्यामुळे पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करावा लागत नाही, असे सुनील गावसकरांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.