kavya maran Instagram
क्रीडा

IPL स्पर्धेत संघ तळाला, पण माणुसकीत टॉपला!

आतापर्यंत आयपीएलमधील फ्रेंचायझीकडून मिळालेली ही सर्वाधिक मोठी मदत आहे.

सुशांत जाधव

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे (corona spread in india) जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांना कोरोनामुळे जीव गमावण्याची वेळ आली. देशावर ओढावलेल्या संकटाच्या काळात क्रिकेट खेळाडूंसह आयपीएलच्या फ्रेंचायझींकडून (ipl franchise) आपापल्या परिने आर्थिक मदत देण्यात येत आहे. सनरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) फ्रेंचायझीने कोरोनाच्या लढाईसाठी आर्थिक हातभार लावला आहे. या संघाने 30 कोटींच्या मदतीची घोषणा केली. आतापर्यंत आयपीएलमधील फ्रेंचायझीकडून मिळालेली ही सर्वाधिक मोठी मदत आहे.

सनरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) च्या संघाची यंदाच्या हंगामातील कामगिरी निराशजनक राहिली. मात्र कोरोनाच्या लढ्यात संघाने सर्वांना मागे टाकले आहे. सनरायझर्स हैदराबादने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भातील माहिती दिलीये. सन टीव्ही (सनराइजर्स हैदराबाद) ने 30 कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून दिली आहे. देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात देण्याचा एक छोटा प्रयत्न फ्रंचायझीकडून करण्यात आला आहे, असा उल्लेखही निवेदनात करण्यात आलाय.

सनरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज यांनी मदतीचा हात पुढे केला होता. राजस्थान रॉयल्सच्या संघासह दिल्ली कॅपिटल्सनेही फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत देऊ केली आहे. फ्रेंचायझीशिवाय पॅट कमिन्स, ब्रेट ली, विराट कोहली. एमएस धोनी यासारख्या खेळाडूंनी कोरोनाच्या लढ्यासाठी आर्थिक निधी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT