India vs Nepal U19 Sakal
क्रीडा

India vs Nepal U19 : भारताच्या युवा संघाचे लक्ष्य उपांत्य फेरीचे

सकाळ वृत्तसेवा

ब्लोमफाँटेन : सर्वाधिक पाच वेळा विजेता ठरलेला भारताचा युवा क्रिकेट संघ उद्या दुबळ्या नेपाळच्या युवा संघाचा सामना करणार आहे. उदय सहारन याच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने यंदा दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्‍वकरंडकात कात टाकली असून नेपाळविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेशही पक्का होणार आहे.

सुपर सिक्समधील गट एकमध्ये भारत व पाकिस्तान यांचे समसमान ६ गुण झाले आहेत. भारताची सरासरी ३.३२ अशी असून पाकिस्तानची सरासरी १.०६ अशी आहे. भारत पहिल्या स्थानावर असून पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

गट एक व गट दोन यांच्यामधून अव्वल दोन देश पुढल्या फेरीत अर्थातच उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत. गट एकमधून भारत, पाकिस्तान यांच्यासह बांगलादेश व न्यूझीलंड या देशांनाही अंतिम चारमध्ये पोहोचण्याची संधी असणार आहे.

कमी लेखणार नाही

नेपाळच्या संघाकडून मोठ्या अपेक्षा नसल्या तरी भारतीय संघ त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही. नेपाळने सुरुवातीच्या लढतीत अफगाणिस्तानला धूळ चारली. कर्णधार देव खनाल व आकाश चंद यांनी धमक दाखवली.

आजची सुपर सिक्स लढत

भारत-नेपाळ, ब्लोमफाँटेन

दुपारी १.३० वाजता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

SCROLL FOR NEXT