IND vs AUS T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी 20 सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. दरम्यान, जवळपास 14 महिन्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली टी 20 संघात परतले आहेत. मात्र त्यांना पुन्हा संघात स्थान देण्याबद्दल मतमतांतर आहेत. भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने देखील रोहित - विराटला टी 20 संघात घेण्याबाबत आपले मत व्यक्त केलं आहे.
रैना म्हणाला की, 'तुम्ही जर वर्ल्डकपचे सामने होणारी ठिकाणं पाहिली तर तेथील खेळपट्टी थोडी ट्रिकी आहे. भारताला अशा खेळपट्ट्यांवर खेळताना अनुभवी खेळाडूंची गरज भासणार आहे. भारताकडे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडू आहेत. विराट कोहलीने टी 20 मध्ये जवळपास 12000 धावा केल्या आहेत.'
सुरेश रैना म्हणाला की, 'विराट कोहलीचं संघात असणं हे भारतीय फलंदाजीला चांगला बूस्ट देईल. त्यांच्या उपस्थितीत भारताला टी 20 वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे. या दोघांची वनडे वर्ल्डकपमधील कामगिरी चांगली होती. एक नेता म्हणून रोहित शर्मा ड्रेसिंग रूममधील वावर उत्तम आहे.'
रैनाने कोहलीने टी 20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी असे सुचवले आहे. रोहित आणि यशस्वी जयस्वाल सलामीला खेळले पाहिजे असेही तो म्हणाला.
'मला असे वाटते की विराटने तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी. त्यामुळे फलंदाजीला थोडा भक्कमपणा येईल. विशेष करून युएस आणि वेस्ट इंडीजमधील खेळपट्ट्यावर याची गरज आहे. आपल्याकडे जयस्वाल, रिंकू सिंह आणि शुभमन गिल याारखे फिअरलेस आणि युवा क्रिकेटपटू आहेत. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली संघाला स्थिरता देतील.
ज्यावेळी आपण धावांचा पाठलाग करू त्यावेळी त्यांची उपस्थिती खूप महत्वाची असणार आहे. विशेषकरून वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत त्यांची गरज आहेच.
सुरेश रैना रिंकू सिंहच्या कामगिरीवर जाम खूष आहे. तो म्हणाला की, 'मिळालेल्या संधीचा फायदा घेत रिंकूने चांगली कामगिरी केली आहे. त्याने मॅच फिनिशरचे गुण त्याच्यात असल्याचेही दाखवून दिलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.