Ind vs Wi 1st Test Playing-11  
क्रीडा

Team India : आशिया कप आधी 'या' खेळाडूने वाढवले कोच​​-कर्णधाराचे टेन्शन! संघातून होणार हकालपट्टी?

सकाळ ऑनलाईन टीम

India vs West Indies ODI Series : भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका 2-1 ने जिंकली. टीम इंडियाने तिसरा सामना 200 धावांनी जिंकला, जो वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताचा सर्वात मोठा वनडे विजय आहे. आशिया कप पाहता एकदिवसीय मालिकेत प्रशिक्षक राहुल द्रविडने बरेच प्रयोग केले, मात्र आता आशिया कपपूर्वी एका स्टार खेळाडूने प्रशिक्षक आणि कर्णधाराचे टेन्शन वाढवले ​​आहे. हा खेळाडू वेस्ट इंडिज दौऱ्यावर चांगलाच फ्लॉप झाला आहे.

भारतीय संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला वेस्ट इंडिज दौऱ्यावर चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी निघाली नाही. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 19 धावा, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 24 धावा आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 25 धावा केल्या. मधल्या फळीत तो टीम इंडियाचा कमकुवत दुवा आहे. तो आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे वनडे संघातून त्यांची हकालपट्टी होऊ शकते.

दुखापतग्रस्त श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांना आशिया कपमध्ये खेळणे कठीण आहे. या दोन्ही खेळाडूंचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन सुरू आहे. या दोन्ही खेळाडूंवर यशस्वी शस्त्रक्रियाही झाल्या आहेत, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप 2023 साठी त्यांच्यासाठी तंदुरुस्त होणे अशक्य आहे. अशा स्थितीत खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या सूर्यकुमार यादवचे आशिया कप स्पर्धेत भारतीय मधल्या फळीत खेळणे जवळपास निश्चित झाले आहे, ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे.

सूर्यकुमार यादवने टीम इंडियासाठी 26 एकदिवसीय सामने खेळले आहेत, मात्र तो प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे. वनडेत त्याची सरासरी 23.80 आहे. 2021 मध्ये त्याने टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु खराब फॉर्ममुळे तो संघात आपले स्थान निश्चित करू शकला नाही.

त्याने टीम इंडियासाठी 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 511 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, टी-20 क्रिकेटमध्ये त्याने संघासाठी 48 सामन्यांमध्ये 1675 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT