Suryakumar Yadav Hit Half Century India Set 186 Runs Target In Front of Zimbabwe  esakal
क्रीडा

Suryakumar Yadav : 'सूर्या' अभी जिंदा है! मोठ्या पडझडीनंतर भारताला सावरले

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav Hit Half Century India Set 186 Runs Target In Front of Zimbabwe T20 World Cup 2022

भारताने सुपर 12 फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरूद्ध आक्रमक सुरूवात केली. मात्र मधल्या षटकात भारताच्या पाठोपाठ तीन विकेट पडल्याने भारत अडचणीत आला होता. मात्र सूर्यकुमार यादवने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिला. सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 61 धावा ठोकत भारताला 186 धावांपर्यंत पोहचवले.

भारताचा कर्णधार रोहित शर्माला झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात देखील मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याला मुजारबानीने 15 धावांवर बाद केले. रोहित शर्मा 15 धावांवर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने येताक्षणीच आक्रमक सुरूवात केली. त्याला केएल राहुलने देखील चांगली साथ देत भारताला पॉवर प्लेमध्ये 46 धावांपर्यंत पोहचवले.

पॉवर प्लेनंतर विराट कोहली आणि केएल राहुलने आपल्या आक्रमकपणाची धार अजून वाढवली. या दोघांनी भारताला 8 षटकात 68 धावांपर्यंत पोहचवल्यानंतर झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने 9 व्या षटकात फक्त 3 धावा देत भारताच्या धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल - विराटने 10 षटकात 8 धावा करत भारताला 79 धावांपर्यंत पोहचवले.

10 षटकानंतर भारताचे दोन सेट झालेले फलंदाज केएल राहुल आणि विराट कोहली हे मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. राहुल अर्धशतकानंतर लगेचेच परतला. मात्र नुकत्याच आलेल्या पंतनेही तीच चूक करत मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली. भारताने पाठोपाठ तीन विकेट गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार फलंदाजी करत भारताला 18 व्या षटकात 150 धावांचा टप्पा पार करून दिला.

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने अर्धशतकी भागीदारी रचल्यानंतर पांड्या 20 षटकात 18 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने षटकार आणि चौकारांची बरसात करत 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर भारताने 20 षटकात 5 बाद 186 धावा केल्या. सूर्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला. सूर्याने 25 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT