नवी दिल्ली : वेस्ट इंडीजचा महान खेळाडू ब्रायन लारा याने भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तो म्हणाला, वेस्ट इंडीजमध्ये जून महिन्यात खेळवण्यात येणाऱ्या टी-२० विश्वकरंडकात भारतीय संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायला हवे.
ब्रायन लारा पुढे म्हणाला, सूर्यकुमार यादव हा टी-२० क्रिकेटमधला दिग्गज खेळाडू आहे. सर विव रिचर्डस् यांना विचारले असता तेही म्हणतील की जास्तीत जास्त चेंडू खेळायला मिळायला हवेत. सूर्यकुमारनेही १० ते १५ षटके फलंदाजी केल्यास काही घडू शकते हे सर्वांनाच माहीत असावे.
भारताने प्रथम फलंदाजी केली, तर सूर्यकुमार टीम इंडिया खूप पुढे नेऊ शकतो. धावांचा पाठलाग करतानाही त्याच्याकडून चमत्कार घडू शकतो, अशा शब्दांत ब्रायन लारा याच्याकडून सूर्यकुमारचे कौतुक करण्यात आले.
दरम्यान, सोमवारी झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल लढतीत मुंबई इंडियन्ससाठी खेळताना सूर्यकुमार यादवने धडाकेबाज शतक झळकावत संघाला शानदार विजय मिळवून दिला. या खेळीमुळे ब्रायन लाराच्या मताचे महत्त्व पटू लागले आहे.
ब्रायन लारा याला टी-२० विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्याबाबत विचारले असता तो म्हणाला, २००७मधील एकदिवसीय विश्वकरंडकात भारतीय संघाला सुरुवातीलाच बाद होण्याच्या नामुष्कीचा सामना करावा लागला होता;
पण यंदा भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश करावा. तसेच जेतेपदासाठीच्या लढतीत त्यांच्यासमोर वेस्ट इंडीजचे आव्हान असावे. अर्थातच भारत- वेस्ट इंडीज यांच्यामध्ये अंतिम सामना होईल, असे भाकीत ब्रायन लाराकडून वर्तवण्यात आले आहे.
ब्रायन लाराने भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीचे कौतुक केले. तो म्हणाला, भारतीय संघाने चार फिरकी गोलंदाजांना संघात संधी दिली असली तरी अंतिम अकरा जणांच्या चमूत चार फिरकीपटूंना स्थान मिळणार नाही. युझवेंद्र चहल हा खूप छान कामगिरी करीत आहे. त्याच्यासोबत कुलदीप यादवही प्रभाव टाकत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.