Pujara-Rahane 
क्रीडा

रहाणे किंवा पुजाराच्या जागी 'या' खेळाडूला संधी द्या- इंजिनियर

विराज भागवत

पाहा तुम्हाला पटतंय का त्यांचं मत

Ind vs Eng: पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने दुसरा सामना १५१ धावांनी जिंकला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने सर्वाधिक १८० धावांची खेळी केली. पण १२९ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या राहुलला सामनावीराचा किताब मिळाला. काही दिवसांपासून लय सापडत नसलेले अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनाही सूर गवसला. पुजाराने ४५ तर अजिंक्यने ६१ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. असे असूनही भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनीयर यांच्या मते रहाणे किंवा पुजारा याला संघाबाहेर बसवून त्याच्या जागी एका नवख्या खेळाडूला संधी मिळायला हवी.

"मी सूर्यकुमार यादवचा खूप मोठा चाहता आहे. तो अप्रतिम खेळाडू आहे. रहाणे किंवा पुजाराच्या जागी त्याला संघात स्थान द्यायला हवे असं मला वाटतं. रहाणे किंवा पुजारा हे प्रतिभावान खेळाडू आहेत यात वादच नाही, पण सूर्या हा मॅचविनर आहे. सध्या श्रेयस अय्यर, शुबमन गिल हे दुखापतग्रस्त आहेत. अशा वेळी तर सूर्यकुमारला संघाच नक्कीच स्थान मिळायला हवे. सूर्या हा आक्रमक खेळाडू आहे. तो झटपट शतक ठोकू शकतो किंवा वेगाने ७०-८० धावांची खेळी करू शकतो. सूर्य़ा हा उत्तम फलंदाज, चांगला फिल्ड आणि एक अतिशय चांगला माणूस आहे", असे ते म्हणाले.

Suryakumar-Yadav

तिसऱ्या कसोटीसाठी संघ कसा असेल?

लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी संयमी आणि शानदार खेळी केली. त्यामुळे त्या दोघांपैकी कोणालाही वगळून सूर्यकुमारला संघात स्थान मिळणं जरा कठीणच आहे. त्याचसोबत पृथ्वी शॉ यालाही संघात स्थान मिळण्याची शक्यता धूसर आहे. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोन्ही सलामीवीर दमदार कामगिरी करत असल्याने त्याला संधी मिळणं जवळपास अशक्य आहे. भारत-इंग्लंड तिसरी कसोटी २५ ते २९ ऑगस्ट दरम्यान लीड्सच्या मैदानावर होणार आहे. इंग्लंडच्या संघाने डेव्हिड मलान आणि साकीब मेहमूद या दोघांना चमूत समाविष्ट करून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SCROLL FOR NEXT