IND vs AUS Suryakumar Yadav : अखेर भारताचा 360 डिग्री प्लेअर सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून वनडे क्रिकेटमध्ये अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहज पराभव केला.
शुभमन गिल (74) आणि ऋतुराज गायकवाड (71) यांनी 142 धावांची दमदार सलामी दिल्यानंतर सूर्यकुमार आणि केएल राहुलने चौथ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी रचली. राहुलने नाबाद 58 धावांची खेळी केली. भारताने ऑस्ट्रेलियाचे 277 धावांचे आव्हान 5 विकेट्स आणि 8 चेंडू राखून पार केले.
भारतीय सलामीवीर ऋतुराज गायकवाड (71) आणि शुभमन गिल (74) यांनी 142 धावांची दमदार सलामी दिल्यानंतर भारताचा डाव घसरला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर आलेला श्रेयस अय्यर देखील 4 धावांची भर घालून माघारी गेला. पाठोपाठ गिल देखील बाद झाला.
यानंतर आलेल्या केएल राहुल आणि इशान किशन यांनी डाव सावरत भारताला 31 षटकात 180 धावांपर्यंत पोहचवले. मात्र इशान किशनने राहुलची 18 धावा करत साथ सोडली. किशन बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने सावध सुरूवात केली.
दुसऱ्या बाजूने केएल राहुलने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी रचली. सुरूवात संथ करणाऱ्या सूर्याने स्लॉग ओव्हर्स येताच आक्रमक फटकेबाजी केली. त्याने सामना जवळ आणला.
मात्र विजयासाठी 11 धावांची गरज असताना तो 50 धावा करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुलने चौकार आणि षटकार मारत सामना संपवला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.