भारतीय संघाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) त्याच्या धमाकेदार खेळीमुळं चर्चेत आहे. Police Invitation Shield स्पर्धेतील फायनल सामन्यात सुर्यकुमार यादवनं 249 धावांची जबरदस्त खेळी केली. सुर्याने Parsee Gymkhana चे प्रतिनिधीत्व करताना Payyade SC विरुद्धच्या सामन्यात 37 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने त्याने 152 चेंडूत 249 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याच्या संघाने 9 गड्यांच्या मोबदल्यात 524 धावा ठोकल्या होत्या.
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी सुर्याने धमाका करत स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. लंचपूर्वी शतक झळकावल्यानंतर सुर्यकुमार यादवने आक्रमक खेळ दाखवला. आपल्या खेळीबद्दल तो म्हणाला की, लंचनंतर आक्रमक खेळी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरलो होतो. नैसर्गिक खेळी करण्यावर भर दिला. ग्राउंड छोटे होते याचा फायदा घेत सहज चौकार मारले. संघातील सहकाऱ्यांनी केलेल्या जलोषानंतर मला द्विशतक पूर्ण झाल्याचे समजले. माझ्या डोक्यात द्विशतक नव्हते. जास्तीत जास्त धावा कशा करता येतील, या उद्देशाने खेळत होते, असे सुर्यकुमार आपल्या स्फोटक खेळीबद्दल म्हणाला.
न्यूझीलंड विरुद्धच्या जयपूर टी-20 सामन्यात सुर्यकुमार यादवनं मॅच विनिंग खेळी केली होती. पण त्यानंतर उर्वरित दोन सामन्यात त्याला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही त्याला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. 14, 8, 49 आणि 4 अशा धावा केल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही नैसर्गिक आणि सकारात्मक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. माझे शॉट्स सिलेक्शनही योग्य होते. पण मला अपयश आले. शॉट्स मारताना कोणत्याही प्रकारे आळस केला नाही, असे स्पष्टीकरणही सुर्याने दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.