Paris Olympics 2024 Swapnil Kusale News sakal
क्रीडा

Swapnil Kusale : पॅरिसमध्ये मेडल जिंकून कोल्हापूरचा पठ्ठ्या आला रे...! स्वप्नील कुसळेचं पुण्यात जंगी स्वागत - Video

Paris Olympics 2024 Swapnil Kusale News : महाराष्ट्राचा मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पॅरिसमधील ऑलिंपिक या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात ऐतिहासिक ब्राँझपदक पटकावत भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर डौलाने फडकवला.

Kiran Mahanavar

Paris Olympics 2024 Swapnil Kusale : महाराष्ट्राचा मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पॅरिसमधील ऑलिंपिक या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात ऐतिहासिक ब्राँझपदक पटकावत भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर डौलाने फडकवला. २८ वर्षीय स्वप्नील याने महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.

खाशाबा यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावत नवा इतिहास रचला होता. स्वप्नील याने तब्बल ७२ वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याचा करिष्मा करून दाखवला. महाराष्ट्राच्या खेळाडूने वैयक्तिक प्रकारात भारताला दिमाखात पदक जिंकून दिले. आपल्या पहिल्यावहिल्या ऑलिंपिकमध्ये त्याने देदीप्यमान कामगिरी केली.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकून भारताला गौरव मिळवून देणारा नेमबाज स्वप्नील कुसळे याचे पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. कुसळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळील कांबळवाडी गावचा रहिवासी आहेत. त्याचे वडील शाळेत शिक्षक असून आई सरपंच आहे. कुसाळे हे २०१५ पासून मध्य रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

स्वप्नील कुसळेने २००९ मध्ये शूटिंगला सुरुवात केली आणि २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तो टोकियो ऑलिम्पिक २०२०च्या वेळी निवड निकष कमी फरकाने चुकला. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरीला अधिक महत्त्व दिले जात होते.

स्वप्नील कुसाळे याने शूटिंग रेंजवर अचूक लक्ष्यभेद करीत भारताच्या पॅरिसमधील स्पर्धेची पदकसंख्या तीनवर नेली. भारताचे पॅरिसमधील ऑलिंपिकमधील हे तिसरे पदक होते. ही सर्व पदके नेमबाजीतील आहेत.

स्वप्नील आधी मनू भाकर हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदक पटकावत भारताचा ऑलिंपिकमधील पदकाचा श्रीगणेशा केल्यानंतर पुन्हा तिनेच सरबज्योत सिंग याच्या साथीने मिश्र १० मीटर एअर पिस्तूल या प्रकारात आणखी एका ब्राँझपदकावर मोहर उमटवली. ऑलिंपिकच्या इतिहासातील भारताचे नेमबाजीतील हे सातवे पदक होय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: प्रचंड चढ-उतारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद; निफ्टीने 23,532 अंकांवर, कोणते 10 शेअर्स वाढले?

Latest Maharashtra News Updates : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर खाजगी विमानाचं ईम्मर्जन्सी लँडिंग

अखेर तारक मेहतामधील भिडेंची सोनू अडकणार लग्नबंधनात ! टप्पूशी नाही तर या क्रिएटरशी डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ

३८ चेंडूंत १७८ धावांचा पाऊस! RCB चा निर्णय चूकला, संघातून रिलीज केलेल्या Mahipal Lomror चे खणखणीत त्रिशतक

Mallikarjun Kharge: खर्गेंच्या सभेचा मंडप कोसळला! त्र्यंबकेश्वरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT