hend zaza sakal
क्रीडा

सीरियातून उगवलेला आशेचा नवा किरण

या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी ती पाचवी मुलगी होती, की जिचे वय तेरा वर्षांच्या आत होते.

विजय वेदपाठक

युद्धग्रस्त आणि दहशतवादग्रस्त सीरियामधून एक आशेचा किरण टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पोहचला. तिने दमदार कामगिरी केली. टेबल टेनिस महिलांच्या एकेरीत तगडे आव्हान असतानाही या १२ वर्षीय कुमारीने चमक दाखविली. पदकाने हुलकावणी दिली तरी तिने असंख्य टेबल टेनिस चाहत्यांची मने जिंकली. ही बारावर्षीय राजकन्या आहे हेंडा झाझा.

या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी ती पाचवी मुलगी होती, की जिचे वय तेरा वर्षांच्या आत होते. तिची ऑलिम्पिकसाठी निवड झाली तेव्हा सीरियामधील झाडून साऱ्या मीडियाने तिचे कोडकौतुक केले होते. टेबल टेनिसचा तिचा प्रवास वयाच्या सातव्या वर्षी सुरू झाला. हामा हे तिचे जन्मगाव दहशतवाद आणि युद्धखोरीने पछाडलेले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत तिने आपल्या मोठ्या भावासह टेबल टेनिसचे स्वप्न नुसते पाहिले नाही, तर ते सत्यात आणण्यासाठी पालकांच्या मदतीने कठोर मेहनत घेतली.

भावाचे बोट धरून तिने सुरू केलेल्या या प्रवासाची आता जगाने नोंद घेतली आहे. आपल्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या खेळाडूंबरोबर तिने सरावाला सुरुवात केली; पण तिची चमक काही वेगळीच होती. तिचे अंगभूत कसब ओळखून प्रशिक्षकांनी वेस्ट आशिया होप्स वीक ॲण्ड चॅलेंज स्पर्धेसाठी तिची निवड केली.

तिच्या जन्मगावी हामामध्ये ती आठवड्याचे सहा दिवस प्रत्येकी तीन ते चार तास सराव करते. सराव ठिकाण म्हणजे गैरसुविधांनी भरलेले. चार जुनाट टेबलं, विजेची पुरेशी व्यवस्थाच नाही, त्यामुळे अनेकदा सूर्यप्रकाशानुसार सरावाच्या वेळेत बदल, अशा अनेक आव्हानांचा तिच्या बालसुलभ मनावर कुठलाही परिणाम झाला नाही. त्या उलट एक प्रखर जिद्द तिच्यात निर्माण झाली. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी ती देशाची पहिली टेबल टेनिसपटू ठरली.

तिचे प्रशिक्षक अलजमान एका मुलाखतीत म्हणतात, की इतक्या कमी वयात गुणवत्ता असणे, हा चमत्कारच आहे; पण त्याला जोड आहे ती तिच्या कष्टाची. आजही ती कधीही चेंडू आणण्यासाठी चालत जात नाही तर धावतच सुटते. तंत्र आणि अनुभव या आघाडीवर ती यापुढेही शिकत राहील; पण ऑलिम्पिकचा महत्त्वाचा टप्पा तिने पार केला आहे. हा देशातील प्रत्येक मुलीसाठी एक मोठा आदर्शच आहे.

अगदी लहान वयात झाझाने लहान ते वरिष्ठांपर्यंतच्या सर्व गटांचे राष्ट्रीय विजेतेपद पटकाविले आहे. सीरियातून बाहेर पडून आशियामधील अनेक स्पर्धांची पदके तिने स्वतःच्या नावावर कोरली आहेत. वयाच्या अकराव्या वर्षी तिने वेस्ट आशिया स्पर्धेचे विजेतेपद पटकावून ऑलिम्पिकसाठी दरवाजे उघडले. ऑलिम्पिकमध्ये देशाचे ध्वजसंचलन करण्याचा मानही तिला या निमित्ताने मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT