T20 Cricket Last Over 6 ball 6 Wickets Viral Video esakal
क्रीडा

VIDEO: शेवटच्या षटकात सहा चेंडूत सहा विकेट; स्लॉग ओव्हरमध्ये हवा असा बॉलर!

सकाळ डिजिटल टीम

Cricket Viral Video : क्रिकेट हा असा खेळ आहे ज्या खेळात कधी कोण कसा बाजी पलटवू शकतो हे सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये अनेक भन्नाट विक्रम झाले आहेत. तसात विक्रम टी 20 क्रिकेट (T20 Cricket) सामन्यावेळी झाल्याचे पहायला मिळालं. सर्वसाधारणपणे टी 20 क्रिकेटमधील 20 व्या षटकात षटकार आणि चौकारांची बरसात होत असते. या विसाव्या षटकात कोणी 6 चेंडूत 6 षटकार ठोकले तर नवल वाटणार नाही. मात्र टी 20 मध्ये 20 व्या षटकात 6 चेंडूत 6 विकेट पडल्या तर तुम्ही नक्की अवाक होणार.

नेपाळ प्रो क्लब चॅम्पियनशिपमध्ये (Nepal Pro Club Championship) असा अजब प्रकार घडला. या लीगमधील मलेशिया क्लब इलेव्हन आणि पुश स्पोर्ट्स दिल्ली या दोन क्लबमध्ये सामना सुरू होता. या सामन्यात मेलिशियाचा गोलंदाजा वीनरदीप सिंगने (Virandeep Singh) पुश स्पोर्स्ट दिल्लीचे 20 व्या षटकात तब्बल पाच फलंदाजी पॅव्हेलियनमध्ये धाडले. डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाची ही शेवटची ओव्हर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या षटकात एक फलंदाज धावबाद झाला.

अखेरच्या सहा चेंडूतील थरार

20 व्या षटकात वीनरदीप सिंगने पहिला चेंडू वाईड टाकला. त्यानंतर त्याने दिल्लीच्या मृगांक पाठकला बाद केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर इशान पांडे धावबाद झाला. तिसऱ्या चेंडूवर अनिंदो नहाराय बोल्ड झाला. चौथ्या चेंडूवर विशेष सरोहाची विकेट गेली, तोही बोल्ड झाला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर जतिन सिंघल कॅच आऊट झाला. त्याचा कॅच खुद्द वीरनदीपने पकडला. षटकाच्या अखेरच्या चेंडूवर स्पर्शचा त्रिफळा उडवला.

पुश स्पोर्ट्स दिल्लाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 132 धावा केल्या. त्यानंतर मलेशिया क्लब इलेव्हनने हे टार्गेट 17.3 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. मात्र हा सामना शेवटच्या षटकामुळे इतिहासात नोंदवला गेला. डावखुऱ्या फिरकीपटूने वीरनदीप सिंगने भन्नाट गोलंदाजी करत डेथ ओव्हरचा अर्थच उलटा करून टाकला. टी 20 क्रिकेटमध्ये शेवटची षटके ही गोलंदाजांसाठी मरण असतात. मात्र वीनदीपने ते मरण फलंदाजांवर थोपले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

Will Jacks Video: RCB चा शतकवीर मुंबई इंडियन्सने घेतला अन् आकाश अंबानी बंगळुरूच्या संघमालकांना थँक्यू म्हणून आला

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT