आयपीएलचा 15 वा हंगाम संपल्या संपल्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. कारण भारत या दौऱ्यानंतर लगेचच एका सामन्याची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. या वरिष्ठ खेळाडूंमध्ये केएल राहुल, रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. रोहित शर्माला जर विश्रांती देण्यात आली तर भारतीय संघाची धुरा (Captaincy) हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) किंवा शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) खांद्यावर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पीटीआयने खराब फॉर्ममधून जात असलेल्या विराट कोहलीला विश्रांती देण्यात येईल असे वृत्त दिले आहे. निवडसमितीसाठी आणि बीसीसीआयसाठी जुलैमधला इंग्लंड दौरा महत्वाचा आहे. याबाबतीत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'भारताच्या सर्व अनुभवी खेळाडूंना कमीत कमी तीन आठवड्यांची विश्रांती मिळणार आहे. रोहित, विराट, राहुल, ऋषभ आणि जसप्रीत बुमराह हे टी 20 मालिकेनंतर थेट इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. बीसीसीआयला आपल्या सर्व खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यापूर्वी ताजे तवाणे ठेवायचे आहे.'
दरम्यान, या वरिष्ठ अधिकाऱ्याने कॅप्टन्सीबाबत बोलताना म्हणाले की, 'निवडसमिती समोर दोन पर्याय आहेत. शिखर धवन ज्याने गेल्या श्रीलंका दौऱ्यावर कर्णधारपद भूषवले होते. त्याच्या जोडीला गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याचा देखील पर्याय आहे. हा दोघांच्या चांगलीच स्पर्धा आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.