India vs Pakistan sakal
क्रीडा

India vs Pakistan : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का

Kiran Mahanavar

India vs Pakistan : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. संघाचा दिग्गज फलंदाज फखर जमान दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. फखर आता टी-20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने शनिवारी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत पुष्टी केली आहे.

कर्णधार बाबर आझम सांगितले की, फखर भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. सध्या ते पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. बाबर म्हणाला, फखर जमान पूर्णपणे तंदुरुस्त नाही त्यामुळे तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) गेल्या महिन्यात दुबईत टी-20 आशिया चषक फायनल दरम्यान क्षेत्ररक्षण जमानला दुखापत झाली होती. उजवा गुडघा आणि अद्याप त्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही.

जमानच्या जागी आता डावखुरा फलंदाज शान मसूदचा भारताविरुद्धच्या सामन्यासाठी संघात समावेश केला जाऊ शकतो. मसूदला तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. मसूदने पाकिस्तानकडून इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत पदार्पण केले आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT