T20 World Cup 
क्रीडा

T20 World Cup : ICC चा मोठा निर्णय, आता कोरोनाग्रस्त खेळाडूही खेळणार!

विश्‍वकरंडकासाठी आयसीसीकडून नियमात सवलत

Kiran Mahanavar

T20 World Cup : ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्‍वकरंडकातील पहिल्या फेरीला रविवारपासून सुरुवात झाली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये कोरोनाची लागण झालेला क्रिकेटपटूही खेळू शकणार आहे. आयसीसीकडून तसेच ऑस्ट्रेलियन सरकारकडूनही या स्पर्धेसाठी कोरोना नियमात सूट देण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमधून अशा प्रकारचे वृत्त समोर आले आहे.

या स्पर्धेदरम्यान खेळाडूंची कोरोना चाचणी अनिवार्य असणार नाही. तसेच एखाद्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली असल्यास त्याला विलगीकरणात राहावे लागणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनाची लागण झालेला खेळाडू खेळणार की नाही, याबाबत ठरवले जाणार आहे. तसेच कोरोना झालेल्या खेळाडूला चेहऱ्यावर मास्क लावावा लागणार आहे. तसेच संघातील इतर खेळाडू, स्टाफ यांच्यासोबत अंतर ठेवावे लागणार आहे. त्याला संधी मिळू शकेल.

कोरोना झालेल्या खेळाडूंऐवजी कोणत्या खेळाडूला घेता येईल, हे ठरवणे संघ व्यवस्थापनाला सोपे होणार आहे. कोरोना झालेल्या खेळाडूची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली, तर त्याला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान देता येणार आहे. त्याला पुन्हा संधी मिळू शकणार आहे; अन्यथा जो खेळाडू राखीव असेल, त्याला अंतिम संघात स्थान देण्यात येईल.

ऑस्ट्रेलियाची मॅग्राही खेळली

याआधी ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू तेहलिया मॅग्रा हीदेखील कोरोनाची लागण झालेली असतानाही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळली होती. तेव्हा अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघानेही याविरोधात तक्रार केली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT