t20 world cup 2022 ind vs pak weather forecast melbourne 
क्रीडा

Ind vs Pak : मेलबर्नमध्ये हवामान बदल, जाणून घ्या भारत-पाक सामन्यादरम्यान किती पाऊस

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 Ind vs Pak : भारत - पाकिस्तान सामना जसजसा जवळ येत चालला आहे, तशी मेलबर्न शहरातील वर्दळ वाढू लागली आहे. मेलबर्न येथे भारतीय संघ टी-20 विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्याची खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे. मात्र त्यांच्या आशा पल्लवित होऊ शकतात. मेलबर्नमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. कधी सूर्यप्रकाश तर कधी ढग दिसत आहे.

मेलबर्नमध्ये शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस पडला, परंतु शनिवारी सूर्यप्रकाश होता. चांगली बातमी म्हणजे पुढील दोन दिवस पावसाची शक्यताही कमी आहे. 23 ऑक्टोबर रोजी दिवसभर हवामान स्वच्छ राहणार आहे. आकाश ढगाळ राहील, पण पावसाची शक्यता कमी आहे.

हवामानाचा अंदाज काय आहे?

Weather.com च्या मते, रविवारी दिवसभरात पावसाची 21 टक्के शक्यता आहे. या काळात ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र संध्याकाळनंतर हवामानात बदल दिसून येईल. भारतात जरी तुम्ही हा सामना दुपारी दीड वाजल्यापासून पाहू शकाल, पण त्यावेळी मेलबर्नमध्ये संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. रात्री पावसाची 88 टक्के शक्यता आहे.

पावसामुळे सामना वाहून गेला तर?

ICC ने पहिल्या फेरीसाठी आणि सुपर-12 साठी राखीव दिवस ठेवलेला नाही. अशा परिस्थितीत सामना पावसामुळे सामना वाहून गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल.

  • भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

    स्टँडबाय खेळाडू : श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

  • पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, फखर जाम.

    स्टँडबाय खेळाडू : मोहम्मद हरीस, उस्मान कादिर आणि शाहनवाज दहनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: राज्यभरात मतदान केंद्रांची तोडफोड, कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; जाणून घ्या कुठे काय घडलं?

Wardha Vidhan Sabha Voting: वर्ध्यात निलेश कराळे मास्तरांना मारहाण; Video Viral

Assembly Election Voting 2024: मतदान अधिकारी म्हणाला, कमळाचे बटण दाबा, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप

Assembly Election: मतदानासाठी केंद्रावर आले, मतपेटीवरील बटन दाबताच... गावात हळहळ, काय घडलं?

Stock Market: महाराष्ट्र विधानसभा निकालांचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? बाजार वाढणार की कोसळणार?

SCROLL FOR NEXT