T20 World Cup 2022 New Zealand vs Australia  esakal
क्रीडा

T20 World Cup AUS vs NZ : गतविजेच्या ऑस्ट्रेलियाचा पहिल्याच सामन्यात 89 धावांनी पराभव

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2022 AUS vs NZ Live : टी 20 वर्ल्डकप 2022 च्या सुपर 12 फेरीतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने यजमान ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले. न्यूझीलंडने तब्बल 89 धावांनी सामना जिंकत वर्ल्डकपची विजयी सुरूवात केली. दुसरीकडे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात मोठ्या फरकाने हार पत्करावी लागली. डेवॉन कॉनवॉयच्या नाबाद 92 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकात 3 बाद 200 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव 111 धावात गुंडळाला गेला. मिचेल सँटनर आणि टीम साऊदीने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, सलामीवीर डेवॉन कॉनवॉयच्या नाबाद 92 धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकात 3 बाद 200 धावा केल्या. त्याला साथ देणाऱ्या जेमी नीशमने 13 चेंडूत 26 धावा केल्या. निशमने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने हेजलवूडला शेवटच्या चेंडूवर षटाकर मारत न्यूझीलंडला 200 धावांपर्यंत पोहचवले. तर सलामीवीर फिन एलनने 16 चेंडूत 42 धावा चोपल्या. त्यानेही कांगारूंची 262.50 च्या स्ट्राईक रेटने धुलाई केली. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने 2 तर झाम्पाने 1 विकेट घेतली.

89-7 : टॉप ऑर्डरचा कित्ता मधल्या फळीनेही गिरवला

ऑस्ट्रेलियाचे 4 फलंदाज 50 धावातच गारद झाल्यानंतर मधली फळी थोडा प्रतिकार करेल असे वाटले होते. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाची अवस्था 7 बाद 89 अशी केली. टीम डेव्हिड 11 तर मॅथ्यू वेड 2 धावांची भर घालून परतले. तर मोठी आशा असलेला मॅक्सवेल देखील 20 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. त्याची शिकार इश सोधीने केली.

50-4 : फिलिप्सने पकडला अफलातून कॅच 

ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर स्वस्तात माघारी गेल्यानंतर डाव सावरण्याची जबाबदारी मार्कस स्टॉयनिस आणि मॅक्सवेलवर होती. मात्र मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात स्टॉयनिस 14 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. ग्लेन फिलिप्सने स्टॉनिसचा हवेत डाईव्ह मारत जबदस्त कॅच पकडला.

34-3 :  कांगारूंची टॉप ऑर्डर परतली

न्यूझीलंडने सिडनीवरील चेंडू थांबून येणाऱ्या खेळपट्टीचा पॉवर प्लेमध्ये चांगला वापर करून घेतला. सँटनरने कर्णधार फिंचला 13 तर टीम साऊदीने शॉन मार्शला 16 धावांवर बाद करत कांगारूंची टॉप ऑर्डर पॅव्हेलियनमध्ये धाडली.

5-1 : ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

टीम साऊदीने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा अवघ्या 5 धावेवर त्रिफळा उडवला.

ऑस्ट्रेलियासमोर 201 धावांचे आव्हान

कॉनवॉयने 58 चेंडूत नाबाद 92 धावांची खेळी करत न्यूझीलंडला 200 धावांपर्यंत पोहचवले. नीशमने 13 चेंडूत 26 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

NZ 152/3 (16) : न्यूझीलंडने पार केला 150 चा आकडा

डेवॉन कॉनवॉयने न्यूझीलंडचा डाव एकहाती पेलत संघाला 16 व्या षटकात 150 चा टप्पा पार करून दिला. मात्र विलियमसन नंतर त्याला साथ देण्यासाठी आलेला ग्लेन फिलिप्स 10 चेंडूत 12 धावा करत माघारी फिरला.

125-2 : झाम्पाने जोडी फोडली

ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम झाम्पाने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचणारी कॉनवॉय विलियमसन यांची जोडी फोडली. त्याने 23 चेंडूत 23 धावा करणाऱ्या विलियमसनला पायचीत बाद केले.

NZ 97/1 (10) : कॉनवॉयची आक्रमक फलंदाजी 

एलन बाद झाल्यानंतर न्यूझीलंडची धावगती चांगली ठेवण्याची जबाबदारी दुसरा सलामीवीर डेवॉन कॉनवॉयने चोख पार पाडली. त्याने केन विलियमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचत न्यूझीलंडला 10 षटकात 97 धावांपर्यंत पोहचवले.

56-1 : धडाकेबाज सुरूवात करून देणारा एलन बाद 

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या यजमान ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडने पॉवर प्लेमध्ये चांगलीच धुलाई केली. सलामीवीर फिन एलनने 16 चेंडूत 42 धावा चोपत चौथ्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र त्यानंतर जॉश हेजलवूडने त्याचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Bat: ऑस्ट्रेलियात विराटची क्रेझ! विराटची बॅट खरेदी करायची असेल तर मोजावे लागतील चक्क १ लाख ६५ हजार रुपये

Amravati Assembly Election 2024: दुचाकीवरुन नेल्या ईव्हीएम मशीन; अमरावतीच्या गोपाल नगरमध्ये राडा

Nagpur Crime : धक्कादायक! नागपुरात मतदानानंतर ईव्हीएम घेऊन जाणा-या गाडीची जमावाने केली तोडफोड

Worli Vidhan Sabha Voting: शेवटच्या एका तासात मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढवलं; ठाण्याकडे निघालेला दौरा वरळीकडे वळला...

Vikramgad Assembly constituency Voting : मोखाड्यात मतदान यंत्राची संथ गती, सुर्यमाळ मध्ये रात्री ऊशीरा पर्यंत मतदान 

SCROLL FOR NEXT