T20 World Cup rohit sharma
T20 World Cup rohit sharma 
क्रीडा

T20 World Cup 2024 Final: बार्बाडोसच्या खेळपट्टीने विजयाचा स्वाद दिला, तेथील मातीच रोहितने तोंडात टाकली; पाहा व्हिडिओ

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- शनिवारी भारतीयांना ऐतिहासिक आणि अतीव आनंदाचा क्षण अनुभवता आला. भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे. भारतीय संघाने साऊथ आफ्रिकेसमोर १७७ धावांचे आव्हान ठेवले होते. सामना अत्यंत चुरशीचा झाला. अखेर भारताने साऊथ आफ्रिकेला ७ धावांनी हरवलं. विजयानंतर भारतीय संघाचा जल्लोष आणि आनंद पाहण्या सारखा होता.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण होता. रोहितसह संघातील इतर खेळाडूंचे डोळे आनंदाने पाणावले होते. रोहितने अनोख्या पद्धतीने विजय साजरा केला. तो काही काळ मैदानावर झोपला, त्याने मैदानावर जोरजोरात हात आपटले. त्या खेळपट्टीवर भारतीय संघाने विजय मिळवला त्या बार्बाडोसच्या मैदानावरील मातीचे कण रोहितने पवित्र मानून तोंडात टाकले. रोहितसाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याच्या या कृतीवरून दिसलं.

भारताने साऊथ आफ्रिकेविरोधात मिळवलेला विजय सर्व भारतीयांसाठी आनंदाचा क्षण होता. संपूर्ण देशभर दिवाळीसारखी स्थिती होती. ठिकठिकाणी फटाके फोडले जात होते. सकाळपर्यंत लोकांमध्ये जल्लोष कायम होता. २०२४ च्या टी-२० मध्ये भारताने एकही सामना गमावलेला नाहीये. त्यामुळे या अपराजित संघाचे कौतुक करणे क्रमप्राप्तच होते.

भारतीय खेळांडूच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येकजण एकमेकांना गळ्याला लावून घेत होतं. डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले होते. प्रत्येकजण भावूक झाला होता. अंतिम सामन्यात विराट कोहलीने उत्तम फलंदाजी केली. त्यामुळेच त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. मात्र, सामना जिंकल्यानंतर विराटने टी-२० मधून आपली निवृत्ती जाहीर केली. त्या पाठोपाठ रोहित शर्माने देखील निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी थोडं सुख, थोडं दु:ख अशी स्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: शेअर बाजार पुन्हा नव्या उच्चांकावर; सेन्सेक्स-निफ्टी आणि बँक निफ्टी विक्रमी पातळीवर उघडले

Team India Breakfast : छोले भटुरे, चॉकलेट अन् बाजरीपासून बनवलेले पदार्थ, वर्ल्ड चॅंम्पियन टीम इंडियासाठी 'असा' आहे खास नाश्ता

Poverty in India: भारतात गरिबी झाली कमी; गेल्या 12 वर्षांत परिस्थितीत असा झाला बदल, अहवालात नेमकं काय?

Maharashtra Weather Update: पुढील 24 तास महत्त्वाचे! हवामान विभागाकडून अलर्ट जारी, 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Live News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT