T20 World Cup 2024 : esakal
क्रीडा

T20 World Cup 2024 : भारत-पाक T20 सामना होणारं जगातलं पहिलं मॉड्युलर स्टेडियम कसं आहे?

सकाळ डिजिटल टीम

T20 World Cup 2024 :

आयपीएलनंतर वर्ल्ड कपला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. तर हे सामने कुठे होणार, कोणत्या स्टेडीयमवर याची उत्सुकताही चाहत्यांना लागली आहे.

आयपीएल 2024 नंतर आता क्रिकेट चाहते आयसीसी टी-20 वर्ल्ड कपची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2 जून ते 29 जून या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेचे सामने अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर होणार आहेत.

Icc T20 World Cup 2024

जागतिक स्तरावरील क्रिकेटचे आयोजन अमेरिकेत पहिल्यांदाच होत आहे. टूर्नामेंट सुरू होण्याआधीच न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची बरीच चर्चा होत आहे.

हे स्टेडियम जगातील पहिले मॉड्युलर क्रिकेट स्टेडियम तर आहेच, पण याच ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही होणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या वर्षी जानेवारीमध्ये न्यूयॉर्कमध्ये 34,000 आसनक्षमतेच्या मॉड्यूलर स्टेडियमचे अनावरण केले होते. येथे भारत-पाकिस्तानसह T20 विश्वचषकातील आठ सामने आयोजित केले जातील. या नव्याने बांधलेल्या स्टेडियमबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.

मॉड्यूलर स्टेडियम म्हणजे जे अल्प मुदतीसाठी बांधले जाते. हे स्टेडियम कमी वेळेत बांधून तयार होते. कमी वेळ लागतो कारण ते हे ॲल्युमिनियम आणि स्टीलपासून बनवले जाते. हे स्टेडियम जोडता येणं आणि काम झालं की मोडून ठेवणं सोप्प आहे.

जरी ते टिकाऊ असले तरी ते सामान्य स्टेडियमच्या ठिकाणाप्रमाणेच सुरक्षितता, आराम आणि सुविधा प्रदान करतात. कतार येथे आयोजित फिफा विश्वचषक २०२२ साठी स्टेडियम ९७४ नावाचे मॉड्यूलर स्टेडियम देखील तयार करण्यात आले होते.

न्यूयॉर्क क्रिकेट स्टेडियममध्ये 34,000 इतकी आसनक्षमता आहे. हे इंग्लंडमधील क्रिकेट मैदानांपेक्षा सर्वात मोठे आहे. हे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपेक्षाही मोठे आहे. न्यूयॉर्क क्रिकेट स्टेडियममध्ये प्रिमियम आणि हॉस्पिटॅलिटी सूट्ससह प्रेक्षकांसाठी अनेक आसन पर्याय असतील. त्यात बसवलेले ग्रँडस्टँड गेल्या वर्षी फॉर्म्युला 1 लास वेगास ग्रँड प्रिक्ससाठीही वापरले गेले.

स्टेडियममध्ये फॅन झोन आणि एक पार्टी डेक देखील आहे. 'येथे एका डीजेची व्यवस्था करण्यात आली आहे जो मंत्रमुग्ध गाण्यांद्वारे चाहत्यांचा उत्साह टिकवून ठेवेल. स्टेडियममध्येच विविध प्रकारची खाण्यापिण्याची दुकाने पाहायला मिळतील.  

न्यूयॉर्कच्या मॉड्युलर क्रिकेट स्टेडियमची रचना पॉप्युलस नावाच्या जागतिक दर्जाच्या ठिकाण आर्किटेक्चर फर्मने केली आहे. याच फर्मने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमची रचनाही केली आहे.

क्रिकेट व्यतिरिक्त, पॉप्युलसने न्यूयॉर्कचे यँकी स्टेडियम देखील डिझाइन केले आहे, जे जगातील सर्वात प्रतिष्ठित स्टेडियमपैकी एक आहे. इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्थळ टोटेनहॅम हॉटस्पर स्टेडियम (लंडन) च्या डिझाइनची जबाबदारीही या फर्मवर सोपवण्यात आली होती.

न्यूयॉर्क क्रिकेट स्टेडियममधील सामने पुढीलप्रमाणे असतील

3 जून: श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका

5 जून: भारत विरुद्ध आयर्लंड

7 जून: नेदरलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका

9 जून: भारत विरुद्ध पाकिस्तान

10 जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश

11 जून: पाकिस्तान विरुद्ध कॅनडा

12 जून : भारत विरुद्ध अमेरिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT