t20 world cup 2024 sakal
क्रीडा

T20 World Cup 2024 : झिम्बाब्वेची बस हुकली... टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 'या' 20 संघांवर शिक्कामोर्तब

Kiran Mahanavar

T20 World Cup : 2024 मध्ये जून महिन्यात आयसीसी टी-20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्यात संयुक्तपणे खेळला जाणार आहे. या मेगा स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत, आणि या 20 संघावर आता शिक्कामोर्तब झाला आहे.

युगांडाचा संघ आफ्रिकेतून शेवटचा संघ म्हणून पात्र ठरला आहे. अफ्रीकन क्वालिफायर मधून दोन संघ आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी पात्र ठरणार होते. ज्यामध्ये नामिबियाने पहिला संघ म्हणून आपले स्थान निश्चित केले, तर युगांडा संघ दुसरा आणि शेवटचा संघ म्हणून आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी झाला.

दुसरीकडे, झिम्बाब्वे संघाचे स्वप्न भंगले आहे. तो सलग दुस-यांदा वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपला ही झिम्बाब्वे मुकला होता.

अफ्रीकन क्वालिफायरमध्ये टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी सात संघांमध्ये पात्रता फेरी खेळली गेली, ज्यामध्ये नामिबियाचा संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर युगांडाचा संघ 6 सामन्यांमध्ये पाच विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे संघ गुणतालिकेत तिसरे स्थान हे निश्चित झाले आहे. युगांडा आणि नामिबियाने प्रत्येकी 10 गुणांसह पूर्ण केले परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे नामिबियाचा संघ प्रथम स्थानावर आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी पात्र होणारे संघ -

वेस्ट इंडिज, यूएसए, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान , नामिबिया, युगांडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT