T20 World Cup 2024 Schedule sakal
क्रीडा

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 चे शेड्यूल जाहीर! 'या' तारखेला वाजणार बिगुल

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Schedule : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2024 च्या : टी20 वर्ल्ड कपच्या यजमानपदाची जबाबदारी दोन मोठ्या देशांना दिली आहे. पुढील वर्षी युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर वर्ल्ड कप होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपची ही नववी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, 2024 टी-20 वर्ल्ड कप पुढील वर्षी 4 ते 30 जून दरम्यान कॅरिबियन आणि युनायटेड स्टेट्समधील 10 ठिकाणी खेळवला जाणार आहे. ICC संघाने युनायटेड स्टेट्समधील काही शॉर्टलिस्ट केलेल्या ठिकाणांची पाहणी केली, जे प्रथमच मोठ्या ICC स्पर्धेचे आयोजन करतील. यामध्ये फ्लोरिडा येथील लॉडरहिल, मॉरिसविले, डॅलस आणि न्यू यॉर्क यांना स्पर्धेचे सामने आणि सरावासाठी निवडण्यात आले आहे.

2024 च्या टी-20 वर्ल्ड कप मध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण 15 संघ पात्र ठरले आहेत. आता फक्त पाच जागा उरल्या आहेत. आयर्लंड, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर यजमान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला थेट प्रवेश मिळाला आहे. या व्यतिरिक्त भारत, इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

2021 आणि 2022 टी-20 वर्ल्ड कप मध्ये पहिल्या फेरीनंतर सुपर 12 टप्प्यांतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परंतु पुढील स्पर्धेत संघांची 2 ऐवजी 4 गटात विभागणी केली जाईल आणि तेथून पात्र ठरण्यासाठी प्रत्येक गटातील टॉप-2 संघांना सुपर-8 मध्ये स्थान दिले जाईल.

सुपर-8 मध्ये पुन्हा दोन गट तयार केले जातील ज्यामध्ये 4-4 संघ ठेवण्यात येतील आणि दोन्ही गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. दोन्ही उपांत्य फेरीतील विजेत्या संघामध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT