T20 World Cup  sakal
क्रीडा

T20 World Cup : श्रीलंकेची पुढल्या फेरीत धडक

सकाळ वृत्तसेवा

गिलाँग : आशियाई करंडक विजेत्या श्रीलंकन क्रिकेट संघाने गुरुवारी येथे झालेल्या टी-२० विश्‍वकरंडकातील अ गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत नेदरलँडवर १६ धावांनी विजय मिळवला आणि दोन विजय व ४ गुणांसह सुपर १२ अर्थातच पुढल्या फेरीत प्रवेश केला. ७९ धावांची खेळी साकारणारा कुशल मेंडिस सामन्याचा मानकरी ठरला. याच गटातून नेदरलँडनेही आगेकूच केली. अमिरातीने नामिबियाला हरवल्यामुळे नेदरलँडलाही पुढे पाऊल टाकता आले.

श्रीलंकेकडून मिळालेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या नेदरलँडला २० षटकांमध्ये ९ बाद १४६ धावाच करता आल्या. सलामीवीर मॅक्सवेल ओडाऊड याने ५३ चेंडूंमध्ये नाबाद ७१ धावांची खेळी साकारत नेदरलँडच्या विजयासाठी प्रयत्न केले. या खेळीत त्याने ६ चौकार व ३ षटकार मारले, पण त्याच्या प्रयत्नांना यश लाभले नाही. फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगा याने २८ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका- २० षटकांत ६ बाद १६२ धावा (कुशल मेंडिस ७९, चरीथ असालंका ३१, पॉल वॅन मीकेरेन २/२५, बास लीडे २/३१) विजयी वि. नेदरलँड २० षटकांत ९ बाद १४६ धावा (मॅक्सवेल ओडाऊड नाबाद ७१, वनिंदू हसरंगा ३/२८, माहीश थिकशाना २/३२).

कुशल मेंडिसच्या ७९ धावा

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामी फलंदाज कुशल मेंडिस याने ४४ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांच्या साह्याने ७९ धावांची लाजवाब खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेला ६ बाद १६२ धावा करता आल्या. पॉल वॅन मीकेरेन व बास लीडे यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Murder : बारामती हादरली! १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थाचा कोयत्याने महाविद्यालय परिसरात खून

Viral video Swiggy CEO: स्विगीच्या सीईओंचे वक्तव्य चर्चेत! जास्त वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय म्हणाले?

IRE vs SA T20I : एका भावाचे शतक, तर एकाने घेतल्या ४ विकेट्स; आयर्लंडने इतिहासात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला नमवले

Latest Maharashtra News Updates : आदिवासी आमदारांची समजूत काढण्यासाठी मंत्री विजयकुमार गावितांचे प्रयत्न सुरू

Chakan MIDC: चाकणमधील तब्बल 50 कंपन्या राज्याबाहेर? उद्योग संघटनेकडून दुजोरा; सुप्रिया सुळेंकडून सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT