prakash padukon esakal
क्रीडा

हे अति झालं, जबाबदारी घ्या! प्रकाश पदुकोण संतापले, लक्ष्य सेनच्या पराभवानंतर भारतीय खेळाडूंना झापले

Lakshya Sen Olympic 2024 बॅडमिंटन दिग्गज प्रकाश पदुकोण यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधील भारताच्या निराशाजनक कामगिरीवर संताप व्यक्त केला.

Swadesh Ghanekar

Paris Olympia 2024 Prakash Padukone : पुरुष एकेरीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात लक्ष्य सेनच्या पराभवानंतर कोच प्रकाश पदुकोण भरपूर संतापले. ते म्हणाले, ऑलिम्पिकपूर्वी भारतीय खेळाडूंची प्रत्येक मागणी पूर्ण झाली आहे आणि त्यांच्याकडून विशेषत: बॅडमिंटन संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती.

२००८ नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅटमिंटनपटूंना पदक जिंकता आलेले नाही. २०१२ मध्ये सायना नेहवालने देशाला पहिले बॅडमिंटन पदक जिंकून दिले होते आणि त्यानंतर पी व्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. यंदा लक्ष्य सेनने उपांत्य फेरीत धडक देऊन इतिहास घडवला. ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणारा तो भारताचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. पण, सेमी फायनलमध्ये त्याची हार झाली.

त्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत मलेशियाच्या ली जि जियाकडून १३-२१, २१-१६, २१-११ अशी हार पत्करावी लागल्यानं लक्ष्यचे कांस्यपदकही हुकले. आघाडीनंतरही लक्ष्य हरल्याने पदुकोण संतापले. “आम्ही बॅडमिंटनमधून एकही पदक जिंकू शकलो नाही, म्हणून मी थोडा निराश आहे,” असे लक्ष्य सेनच्या सामन्यानंतर प्रकाश पदुकोण यांनी पॅरिसमध्ये पत्रकारांना सांगितले.

प्रकाश पदुकोण यांनी ऑलिम्पिकपूर्वी खेळाडूंना पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल क्रीडा मंत्रालय आणि इतरांचे कौतुक केले, परंतु पॅरिसमधील निराशाजनक कामगिरीबद्दल खंत व्यक्त केली. “आम्ही तीन पदकांचे दावेदार होतो. त्यामुळे किमान आजच्या पदकामुळे मला आनंद झाला असता. मी वैयक्तिकरित्या निराश आहे. यावेळी सरकार, SAI आणि TOP सर्वांनी आपली कामं केली आहेत आणि त्यांनी जे केले त्यापेक्षा जास्त कुणी करू शकले नसते. पण, आता खेळाडूंनी जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे.''असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे म्हटले की,“एवढी वर्षे पुरेशा सुविधा किंवा प्रोत्साहन मिळत नव्हते, असे आपण म्हणू शकतो. पण, यावेळी तुम्हाला सुविधा मिळाल्या, आर्थिक मदत मिळाली. फक्त बॅडमिंटनच नव्हे तर ज्या ज्या खेळात पदक जिंकण्याची संधी होती त्या ३०-४० खेळाडूंना हवे ते सर्व दिले गेले. कधीकधी अवास्तव मागण्याही पूर्ण केल्या गेल्या.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT