Tamim Iqbal Shakib Al Hasan : वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर आला असताना बांगलादेश क्रिकेट संघात वादंग निर्माण झाले आहे. बांगलादेशने नुकतेच आपला 15 खेळाडूंचा वर्ल्डकप संघ जाहीर केला. या संघात बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर 15 हजारपेक्षा जास्त धावा करणाऱ्या 34 वर्षाच्या तमिम इक्बालचा समावेश करण्यात आलेला नाही. तर अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे.
तमिम इक्बालचा संघात समावेश नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, कर्णधार शाकिबने तमिमला वगळण्याचे अजब कारण सांगितले. शाकिब म्हणाला की, तो बालिश खेळाडू आहे तो संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळतो.
बांगलादेशमधील टी स्पोर्ट्सशी बोलताना शाकिब म्हणाला की, 'तमिम इक्बाल हा संघाच्या भल्यासाठी मधल्या फळीत खेळण्यास तयार नव्हता. शाकिबने यावेळी रोहित शर्माचे उदाहरण दिले. तो कायम संघाला स्वतःपेक्षा जास्त महत्व देतो.
शाकिब म्हणाला, 'रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत 7 व्या क्रमांकाच्या फलंदाजापासून सलामीवीरापर्यंतची भुमिका बजावली. त्याने 10000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जर एखादा खेळाडू कधी कधी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळला तर ती मोठी समस्या आहे का?'
'माझी बॅट आहे मीच खेळणार इतर कोण खेळणार नाही हे इतकं खूप बालिश आहे. संघासाठी खेळाडूने कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे. तुम्ही 100 करा किंवा 200 करा जर तुमचा संघ हरला तर त्याने काही फरक पडणार नाही. तुम्ही वैयक्तिक माईलस्टोन गाठून काय करणार? तुम्ही फक्त तुमचे नाव मोठं करू इच्छिता?'
शाकिब पुढे म्हणाला की, 'तुम्ही संघाचा विचारच करत नाहीये. लोकं या गोष्टी समजूनच घेत नाहीत. तुम्हाला हा प्रस्ताव का देण्यात आला होता. कारण संघाची ती गरज होती. यात काय गैर होतं? जर तुम्ही असे प्रस्ताव स्विकारता त्यावेळी तुम्ही एक टीम मॅन म्हणून ओळखले जाता. जर तुम्ही वेगळा विचार करत आहात तर तुम्ही टीम मॅन नाही. तुम्ही संघासाठी नाही तर तुमच्या वैयक्तिक रेकॉर्डसाठी, प्रसिद्धीसाठी आणि नावासाठी खेळत आहात.'
शाकिब हा तमिमवर वर्ल्डकपच्या आधी फक्त 2 महिने आधी संघाचे नेतृत्व सोडण्यावरून देखील नाराज आहे. तो म्हणाला की, 'मी ड्रेसिंग रूममध्ये कामय ऐकत होतो की तो कर्णधारपद सोडणार आहे. एवढंच काय खेळाडू त्याला लवकर कॅप्टन्सी सोड जेणेकरून नव्या कर्णधाराला थोडा वेळ मिळेल असे देखील सांगत होते. मात्र ज्याची भीती होती तेच झालं जो नवा कर्णधार आहे त्याला फार वेळ मिळालेला नाही.'
'जर त्याने कॅप्टन्सी सोडली असती तर आशिया कप आणि वर्ल्डकपच्या तोंडावर कर्णधार बदलण्याची गरज लागली नसती. ही गोष्ट 18 महिन्यापूर्वीच होणे अपेक्षित होते. त्यावेळी सर्वांना माहिती होतं की पुढे काय होणार आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.