Tamim Iqbal steps down as Bangladesh ODI captain : आशिया कप 2023 ची सुरुवात 30 ऑगस्टपासून होणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान मध्ये याचे आयोजन केले जात आहे. सर्व संघ आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. यावेळी आशिया कप एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणार आहे. कारण एकदिवसीय विश्वचषकही ऑक्टोबरमध्ये खेळवला जाणार आहे.
आशिया कप 2023 पूर्वी असा एक संघ आहे ज्याच्या कर्णधाराने नुकताच आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच या मोठ्या स्पर्धेत खेळण्याबाबतही साशंकता आहे.
आशिया कपपूर्वी बांगलादेशचा कर्णधार तमिम इक्बालने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आणि आशिया कपतून आपले नावही मागे घेतले आहे. आता शेवटच्या प्रसंगी कोणत्या खेळाडूला कर्णधार बनवायचे या पेचात बांगलादेशचा संघ अडकला आहे, कारण संघाचा विचार पूर्णपणे बदलणार आहे. आता बांगलादेशचा संघ आपल्या खेळाची पातळी कशी वर ठेवतो, ही सर्वात मोठी गोष्ट आहे.
यापूर्वी तमिम इक्बालनेही निवृत्ती जाहीर केली होती. मात्र पंतप्रधानांशी बोलून त्यांनी हा निर्णय मागे घेतला होता. मात्र, आता बांगलादेश क्रिकेट कोणत्या मार्गाने पुढे जाते हे पाहायचे आहे. कारण जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा संघाची कामगिरी कुठेतरी नक्कीच कमी होते. संघाला आशिया कप आणि आगामी विश्वचषक खेळायचे आहे, म्हणजे अजिबात वेळ नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.