tanmay agarwal News Marathi sakal
क्रीडा

Ranji Trophy : ३४ चौकार, २६ षटकार...! तन्मय अग्रवालने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रचला इतिहास

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद, ता. २७ (पीटीआय) ः हैदराबादचा सलामीवीर तन्मय अगरवाल याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान त्रिशतकाचा विश्वविक्रम केला. ही ऐतिहासिक कामगिरी त्याने रणजी क्रिकेट स्पर्धेत प्लेट गटात अरुणाचल प्रदेश संघाविरुद्ध शुक्रवारी केली. आज शनिवारी हैदराबादने हा सामना १ डाव आणि १८७ धाावांनी जिंकला.

२८ वर्षीय तन्मयने अवघ्या १४७ चेंडूंत त्रिशतक केले. या अगोदर सर्वात वेगवान त्रिशतकाचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या मार्को माराइस याच्या नावावर होता. त्याने बॉर्डर या संघातून खेळताना पश्चिम प्रांत या संघाविरुद्ध केला होता.

हैदराबाद आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील हा सामना हैदराबाद शहराच्या बाहेर असलेल्या जनरेशन नेक्स्ट हा क्रिकेट मैदानावर झाला. तन्मयने १६० चेंडूंत एकूण ३२३ धावांची खेळी केली, त्यामुळे हैदराबादने ४८ षटकांतच १ बाद ५२९ धावा तडकावल्या होत्या. त्या अगोदर अरुणाचलचा संघ १७२ धावांत संपुष्टात आला होता.

हैदराबादने आपला पहिला डाव ४ बाद ६१५ धावांवर घोषित केल्यानंतर आजच्या दुसऱ्या दिवशी अरुणाचल प्रदेशचा दुसरा डाव २५६ धावांवर गुंडाळून दोन दिवसांतच सामना जिंकला. दीड शतक झाल्यानंतर मी बेधडक फटकेबाजी सुरू केली. नशीबही माझ्या बाजूने होते. चेंडू बरोबर बॅटवर येत होता आणि मी कसलाही विचार न करता टोलेबाजी करत होतो, असे तन्मयने सांगितले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपण सर्वात वेगवान त्रिशतक केले आहे, हे मला पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कळले, असेही तो म्हणाला.

असे आहेत इतर विक्रम

रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४४३ धावांचा विक्रम भाऊसाहेब निंबाळकर यांच्या नावावर आहे. महाराष्ट्र संघातून खेळताना त्यांनी काठेवार या संघाविरुद्ध केला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच डावाच सर्वाधिक नाबाद ५०१ धावांचा विश्वविक्रम ब्रायन लाराच्या नावार आहे, त्याने इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये वॉर्कशायर संघातून खेळताना केला होता.

रणजी क्रिकेटमध्ये आम्ही दुय्यम श्रेणी गटात आहोत; परंतु अशा प्रकारची खेळी एलिट (अव्वल श्रेणी) गटात शक्य नाही; परंतु मी प्रतिस्पर्धी संघाच्या कमकुवतपणामुळे नाही तर मी माझ्या क्षमतेमुळे ही ऐतिहासिक खेळी करू शकलो.

- तन्मय अगरवाल

संक्षिप्त धावफलक ः अरुणाचल प्रदेश १७२ आणि २५६. हैदराबाद, पहिला डाव ः ४ बाद ६१५ घोषित (तन्मय अगरवाल ३६६ - १८१ चेंडू, ३४ चौकार, २६ षटकार, राहुल सिंग १८५ - १०५ चेंडू, २६ चौकार, ३ षटकार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT