पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा हे त्यांच्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. अलीकडेच रमीझ राजा यांनी आगामी वर्षात खेळासाठी अनेक नवीन प्रकल्पांची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी पासून त्यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तानी क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पण रमीझ राजाच्या प्लॅनवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, माजी पाकिस्तानी क्रिकेटर तनवीर अहमदने पीसीबी अध्यक्षांवर निशाणा साधला आहे. रमीझ राजा यांच्यावर सडकून टीका केली असून, माजी कर्णधार देशाचे क्रिकेट उद्ध्वस्त करेल, असे म्हटले आहे.
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, रमीझ राजाने पदभार स्वीकारल्यापासून केलेली एक चांगली गोष्ट तुम्ही मला सांगा? संघ निवडीसाठी कोणता फॉर्म्युला अवलंबला जातो, हे कोणालाच माहीत नाही. जेव्हा रमीझ राजा यांची पीसीबी अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा मला वाटले होते की परिस्थिती सुधारेल पण आतापर्यंत तसे झाले नाही. तेही माजी सभापतींसारखे निघाले, जे पाकिस्तान क्रिकेटच्या भल्यासाठी खुर्चीवर बसूनच टाईमपास करतात.
रमीझ राजाने अलीकडेच घोषणा केली होती की आता ज्युनियर पीएसएल देखील पीसीबी आयोजित करेल. याबाबत वाद सुरू झाला असून, तनवीर अहमद म्हणतात की, अशा स्पर्धांऐवजी पीसीबीने दोन-तीन दिवसांच्या स्पर्धांचे आयोजन करावे, जेणेकरून ज्युनियर क्रिकेटपटूंना बळ मिळेल.
क्रिकेटची प्रगती करायची असेल, तर तरुणांना प्रदीर्घ क्रिकेट सामने खेळावे लागतील. अशा टूर्नामेंटमुळे तो फक्त 20-20 क्रिकेटचाच विचार करत आहे. रमीझ राजाच्या अशा निर्णयांमुळे पाकिस्तानचे क्रिकेट बरबाद होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. रमीझ राजा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये अनेक गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. यावेळी त्यांनी इंडियन प्रीमियर लीगला विरोध करत बीसीसीआयवरही निशाणा साधला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.