team india bcci plan no players over 30 years age in next t20 world cup cricket news sakal
क्रीडा

वय ठरवणार टीम इंडिया मधील एंट्री; पुढील वर्ल्ड कपपूर्वी BCCIचा मोठा प्लॅन ?

रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या खेळाडूंसाठी दरवाजे बंद ?

सकाळ ऑनलाईन टीम

Team India : ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर आता बदलाची मागणी होत आहे. टीम इंडिया वर्षभरात दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकातून रिकाम्या हाताने परतली आहे. अशा परिस्थितीत संघातील अनेक खेळाडूंची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द धोक्यात आली आहे. पुढील टी-20 विश्वचषक मध्ये खेळणे त्यांच्यासाठी जवळपास अशक्य आहे. साहजिकच बदल होतील. हे कसे आणि कधी होणार हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. दरम्यान असा संकेत मिळाला आहेत की रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या खेळाडूंसाठी दरवाजे बंद होतील.

दोन वर्षांनंतर म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आतापासून टीम इंडियाला तयार करण्यासाठी काम करणार आहे. खेळाडूंची निवड हा या योजनेचा एक भाग आहे. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, आगामी काळात टी-20 फॉरमॅटमध्ये 30 वयापेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंना संघात स्थान दिले जाणार नाही.

एका स्पोर्ट्स वेबसाइटच्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, बीसीसीआय पुढील टी-20 विश्वचषकासाठी संघ तयारीत कठोर निर्णय घेणार आहे, ज्यामध्ये युवा खेळाडूंना आजमावण्यावर भर दिला जाईल. या अंतर्गत आता 30 वर्षांवरील खेळाडूंना टी-20 संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या या वृत्तानुसार, बोर्ड पुढील वर्षी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याने खेळाडूंवर कामाचा भार नियंत्रित करण्यातही मदत होईल यावर बोर्ड विचार करत आहे. मात्र, वयाच्या कल्पनेवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT