Rohit Sharma KL Rahul : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल हे मायदेशात होणाऱ्या श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्मा अजूनही अंगठ्याच्या दुखापातीतून सावरलेला नाही. त्याला बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यानंतर तो तिसरी वनडे आणि दोन्ही कसोटी सामन्यांना देखील मुकला होता.
दुसरीकडे ऑऊट ऑफ फॉर्म असलेला केएल राहुल देखील श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत खेळणार नसल्याची माहिती मिळत आहे. एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केएल राहुल हा जानेवारीत अथिया शेट्टीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे जो यावेळी उपलब्ध नसेल. श्रीलंका भारत दौऱ्यावर 3 ते 15 जानेवारीपर्यंत तीन टी 20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
रोहित शर्मासाठी 2022 हे वर्ष फारसे चांगले गेलेले नाही. या वर्षी त्याने दोनच कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 30 च्या सरासरीने 90 धावा केल्या आहेत. त्याचा यंदाच्या वर्षी कसोटीत सर्वोच्च स्कोर हा 46 धावा इतका आहे. त्याने 2022 मध्ये 8 वनडे सामन्यात 41.50 च्या सरासरीने 249 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. रोहित शर्माने सरत्या वर्षात 29 टी 20 सामने खेळत 24.29 च्या सरासरीने 656 धावा केल्या. त्याचे स्ट्राईक रेट 134.42 इतके राहिले. (Sports Latest News)
दुसरीकडे केएल राहुलने सरत्या वर्षात 4 कसोटी सामन्यात 137 धावा केल्या. त्यात त्याला फक्त एकच अर्धशतक झळकावता आले. 10 वनडे सामन्यात राहुलने 27.98 च्या सरासरूने 251 धावा केल्या आहेत. केएल राहुलने 16 टी 20 सामन्यात 28.93 च्या सरासरीने 434 धावा केल्या. राहुलने सर्व मिळून यंदाच्या वर्षात 30 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 25.68 च्या सरासरीने 822 धावा केल्या आहेत. यात 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.