Ind vs Afg T20 Series marathi news Sakal
क्रीडा

Ind vs Afg T20 Series : भारतीय क्रिकेट संघाला पुन्हा मिळणार नवा कर्णधार? सूर्या अन् पांड्या अनफिट

India vs Afghanistan T20 Series | भारतीय क्रिकेट संघात लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता

Kiran Mahanavar

India vs Afghanistan T20 Series : भारतीय क्रिकेट संघात लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हा बदल भारत आणि अफगाणिस्तान टी-20 मालिकेत पाहायला मिळणार आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव या मालिकेसाठी फिट नसल्याची बातमी आता समोर आली आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) नवीन कर्णधार तयार करू शकते, पण नव्या कर्णधारासाठी बोर्डाकडे फारसे पर्याय नाहीत.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 11 जानेवारीपासून 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, 'सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या फिट नाहीत.

पण भारतीय संघ निवडीशी संबंधित प्रश्नावर बीसीसीआयच्या सूत्राने माहिती दिली की, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेवरून काहीही सांगता येत नाही. आयपीएलमधील पहिल्या महिन्यातील कामगिरीच्या आधारे कोणताही निर्णय घेतला जाईल.

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघ आज शेवटचा कसोटी सामना खेळणार आहेत. यानंतर भारतीय संघ मायदेशी परतणार आहे. मायदेशी परतताच भारतीय संघाला अफगाणिस्तानसोबत टी-20 मालिका खेळायची आहे. हीच बाब लक्षात घेऊन बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. आगरकर कसोटी सामन्यादरम्यानच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलणार असल्याचे मानले जात आहे.

भारतीय संघाला जानेवारीमध्येच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या कारणामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आता जर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव अनफिट आहेत आणि रोहित शर्मा उपलब्ध नसेल तर बीसीसीआयला टी-20 संघाच्या कर्णधारपदासाठी नवीन नावाचा विचार करावा लागू शकतो.

रोहित, हार्दिक आणि सूर्या यांच्या अनुपस्थितीत भारताकडे किमान तीन नावे असतील ज्यांनी टी-20 संघात भारताचे नेतृत्व केले आहे. जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि ऋतुराज गायकवाड अशी ही नावे आहेत. रोहित आणि विराटप्रमाणेच केएल राहुल आणि बुमराह यांनाही टी-20 मालिकेत विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत बीसीसीआयसमोर (BCCI) एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे ऋतुराज गायकवाड, ज्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत संघाची कमान सांभाळली आहे. जिथे त्यांच्यासोबत बहुतेक ज्युनियर खेळाडू होते. अफगाणिस्तानविरुद्धच्या संघात त्याचे अनेक वरिष्ठ सहकारीही पाहायला मिळतात.

शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या उपस्थितीत ऋतुराज गायकवाड यांच्याकडे कमान सोपवण्याची शक्यता कमीच वाटत आहे. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर किंवा शुबमन गिल यांच्याकडे टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे.( Shubman Gill is likely to be handed the captaincy of the T20 team) किंवा बोर्ड ही जबाबदारी अन्य एखाद्या खेळाडूकडे सोपवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT