Team India New Jersey : वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाची नवी जर्सी लाँच करण्यात आली आहे. टीम इंडियाचे अधिकृत किट प्रायोजक अदिदासने बुधवारी (20 सप्टेंबर) एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये कर्णधार रोहित शर्मासह अनुभवी फलंदाज विराट कोहली, उपकर्णधार हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराजसह अनेक खेळाडू दिसत आहेत. 5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
प्रसिद्ध भारतीय गायक रफ्तारने गायलेल्या '3 का ड्रीम' या गाण्यातून जर्सी रिलीज करण्यात आली. 'ड्रीम ऑफ 3' हे लाखो चाहत्यांचे प्रतीक आहे ज्यांना 1983 ते 2011 नंतर त्यांच्या संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय वर्ल्डकप जिंकताना पाहायचा आहे.
आदिदासने जर्सीमध्ये बदल केले आहेत. खांद्यावरच्या तीन पांढऱ्या पट्ट्यांच्या जागी त्याने तिरंग्याच्या तीन रंगांचा समावेश केला आहे. छातीच्या डाव्या बाजूला बीसीसीआयच्या लोगोवर आता दोन तारे आहेत, जे भारताच्या एकदिवसीय वर्ल्डकप विजयाचे प्रतीक आहे.
भारतीय संघ 8 ऑक्टोबरला चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या वर्ल्डकपच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. टीम इंडिया 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
वर्ल्डकपसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.