Team India BCCI Review Meeting : भारतीय संघाने बांगलादेशमधील दुसरी कसोटी तीन विकेट्स राखून जिंकली. मात्र या कसोटी सामन्यात भारत पराभवाच्या छायेत होता. मात्र अश्विन आणि श्रेयस अय्यरने भारताला पराभवाच्या दाढेूतन बाहेर काढत विजय मिळवून दिला. भारताने बांगलादेशला 2 - 0 असा व्हाईट वॉश देत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याच्या दृष्टीने आपली स्थिती मजबूत केली. मात्र भारताचा हा विजयी संघ मायदेशात परल्यानंतर संघातील अनेक खेळाडूंचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
बीसीसीआयने गेल्या अनेक आठवड्यापासून टी 20 वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी रिव्ह्यू मिटिंग घेणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीसाठीचा मुहूर्त ठरल्याचे सांगितले. रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंची टी 20 कारकिर्द ठरवणारी ही बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. (Latest Sports News)
बीसीसीआय अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, 'सध्याच्या घडीला ही बैठक कधी होणार हे निश्चितपणाने सांगता येणार नाही. मात्र हो आशिया कप, टी 20 वर्ल्डकप आणि बांगलादेशमधील वनडे मालिकेतील भारताची कामगिरी चिंताजनक आहे. मात्र आता संघ श्रीलंकेविरूद्ध मालिका खेळणार आहे. त्यामुळे ही रिव्ह्यू बैठक अधिकृरित्या कधी होणार याबाबत आम्ही साशंक आहोत. ही बैठक बहुदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल.'
बीसीसीआयची बहुप्रतिक्षित रिव्ह्यू मिटिंगला गेल्या काही आठवड्यापासून मुहूर्तच लागत नाहीये. ही बैठक टी 20 वर्ल्डकप झाल्यानंतर होणार होती. मात्र तोपर्यंत संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला. त्यानंतर बांगलादेश दौरा आणि आता श्रीलंकेविरूद्धची मालिका तोंडावर असताना बीसीसीआय अशी बैठक घेईल का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.