Team India squad for ICC WTC 2023 : आयपीएल 2023 दरम्यान बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये ७ जूनपासून होणार आहे. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आधीच पात्र ठरले आहेत.
ऑस्ट्रेलियन संघ आधीच जाहीर झाला होता, आता बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. संघाची कमान पुन्हा एकदा रोहित शर्माच्या हाती असेल, तर अशा अनेक खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे, जे भारतीय कसोटी संघातून बराच काळ बाहेर होते.
आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळणाऱ्या आणि उत्कृष्ट खेळ दाखवणाऱ्या अजिंक्य रहाणेला बीसीसीआयने संधी दिले आहे. त्याला पुन्हा एकदा टीम इंडियाचे तिकीट मिळाले आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे नाव अजिंक्य रहाणेचे आहे. त्याला कसोटी स्पेशालिस्ट म्हटले जात असले तरी खराब फॉर्ममुळे त्याचे स्थान गमवावे लागले होते, मात्र आता तब्बल 17 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा टीम इंडियात परतला आहे. याचे कारण म्हणजे आयपीएल 2023 जिथे तो एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. येथे तो स्फोटक फलंदाजी करत आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.