ICC T20 World Cup 2022 : भारताने मेलबर्नमध्ये पाकिस्तानचा चार विकेट्सनी पराभव केला. भारताने गेल्या वर्षाच्या वर्ल्डकपमधील पराभवाचा बदला घेतला. मात्र या विजयाचा आनंद फारकाळ न साजरा करता टीम इंडिया पुढच्या मोहिमेसाठी सिडनीत दाखल झाली. मात्र सिडनीत दाखल झाल्यानंतर टीम इंडियाला जेवणापासून सरावापर्यंत सर्व ठिकाणी वाईट अनुभव येण्यास सुरूवात झाली. दिवळाचा सण सुरू असतानाच टीम इंडियाची जेवणासाठी आभाळ होत होती. सिडनीत संघाला जेवणात थंड सँडविच मिळाले. त्यानंतर त्यांची सरावाची सोय देखील सिडनीपासून 42 किमी अंतावर असलेल्या दुसऱ्या एका छोट्या शहरात करण्यात आली. त्यामुळे टीम इंडियाने सराव सत्राला देखील नकार दिला. संघाला सिडनीत अशा प्रकारच्या वादग्रस्त घटनांचा सामना पहिल्यांदाच करावा लागलेला नाही. सिडनी, टीम इंडिया आणि वाद हे समीकरण 2008 पासून चालत आलेले आहे.
2008 : मंकीगेट
भारतीय क्रिकेट चाहत्याला मंकीगेट म्हटलं की 2008 चा तो ऑस्ट्रेलियाचा दौरा आठवतो. 2007 - 08 मध्ये भारत बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. त्यावेळी सिडनी कसोटीत अँड्र्यू सायमंड्स आणि भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यावेळी हरभजनने सायमंड्सला माकड म्हटल्याचा आरोप करण्यात आला. हरभजनने हे सर्व आरोप फेटाळले होते. मात्र तरी देखील या प्रकरणात हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली. दरम्यान, सचिन तेंडुलकरसह संपूर्ण संघ आणि क्रिकेट बोर्ड यांनी हा निर्णय अमान्य करत दबाव वाढवल्यानंतर ही बंदी मागे घेण्यात आली.
2012 : कोहलीचा अपमान
प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा अपमान करण्यात सिडनीमधील चाहत्यांचा हात कोण धरत नाही. 2012 मध्ये भारताचा स्टार विराट कोहलीलाही याचा अनुभव आला. विराट कोहली सीमारेषेवर फिल्डिंग करत असताना त्याला देखील असभ्य भाषेतील टोमणे मारण्यात आले. यानंतर चिडलेल्या विराट कोहलीने प्रेक्षकांकडे पाहून मधले बोट दाखवले. या प्रकरणाला ऑस्ट्रेलियामधील माध्यमांनी चांगलीच हवा दिली. सर्वांनी विराटवर टिका केली मात्र सिडनीतील प्रेक्षकांच्या गैरवर्तनाकडे कोणाचे लक्ष गेले नाही.
2020 - 21 : बुमराह - सिराजवर वंशद्वेषी टिका
भारताच्या 2020 - 21 च्या ऑस्ट्रेलियात दौऱ्यात भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद रिझवान यांच्यावर सिडनीतील चाहत्यांनी वंशद्वेषी टिका करण्यात आली होती. यावेळी या दोघांना मंकीगेट आणि ब्राऊन डॉग असेही संबोधण्यात आले. यावरून बीसीसीआयने कडक शब्दात आपली नाराजी व्यक्त केली होती. पोसिसांनी देखील चाहत्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.
यंदाचा ऑस्ट्रेलियात होत असलेला टी 20 वर्ल्डकप ही आयसीसीची स्पर्धा आहे. संपूर्ण व्यवस्था ही त्यांची असते. मात्र भारतीय संघ गेल्या 20 दिवसांपासून ऑस्ट्रेलियात आहे. यापूर्वी त्यांनी मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरूद्ध सामना खेळला आहे. सराव सामने देखील खेळले आहे. मात्र सिडनीत आल्यावरच जेवणाच्या बाबतीत तक्रारी काय ते आहे ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.