SA vs IND 2nd ODI Rinku Singh or Rajat Patidar Who will replace Shreyas Iyer in second ODI team india playing 11 cricket news in marathi  eSakal
क्रीडा

Ind vs Afg T20 : भारताच्या टी-20 संघातून 7 मोठी नावे गायब! 'या' स्टार खेळाडूंना नाही मिळाली जागा

India vs Afghanistan Series News |

Kiran Mahanavar

Ind vs Afg T20I squad : भारतीय क्रिकेट संघाला 11 जानेवारीपासून घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. निवडकर्त्यांनी रविवारी 7 जानेवारी रोजी या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माचे कर्णधार म्हणून टी-20 संघात पुनरागमन झाले, तर विराट कोहलीलाही निवड समितीने स्थान दिले. या संघात 7 मोठी नावे दिसत नाहीत.

भारतीय संघ पुढील आठवड्यापासून अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संघ निवडीबाबत सातत्याने चर्चा सुरू होती. सर्वाधिक चर्चा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची होती. निवड समितीने पुन्हा एकदा या दोघांवर विश्वास व्यक्त केला आहे.

संजू सॅमसननेही यष्टिरक्षक म्हणून टी-20 संघात पुनरागमन केले. या सगळ्यात या संघात 7 मोठी नावे दिसली नाहीत, त्यापैकी दोन खेळाडू जखमी झाले आहेत, तर इतर दोघांना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टी-20 संघाची घोषणा होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असलेला सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नसल्याची बातमी आली होती. याशिवाय एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान दुखापत झालेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याही संघाचा भाग असणार नाही. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनाही विश्रांती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या संघात इशान किशनचे नाव नसणे आश्चर्यकारक आहे. त्यांच्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. त्याचवेळी श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांना अफगाणिस्तानविरुद्ध संधी न दिल्यानेही आश्चर्य व्यक्त होत आहे. केएलने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेत कठीण शतक झळकावले होते.

अफगाणिस्तान विरुद्ध भारताचा टी-20 संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव. , आवेश खान, मुकेश कुमार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT