Indian Squad T20 World Cup 2022  
क्रीडा

T20 World Cup : इशानपासून सॅमसनपर्यंत 'या' स्टार खेळाडूंचा टीम इडियामधून पत्ता कट

T20 World Cup 2022 साठी भारतीय संघाची घोषणा झाली पण 'या' स्टार खेळाडूना संघात स्थान मिळाले नाही.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 Indian Squad : ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या T20 World Cup 2022 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इडिया मध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलचे पुनरागमन झाले आहे. आशिया चषक 2022 मध्ये आपल्या डेथ बॉलिंग कौशल्याने प्रभावित करणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील भारतीय संघात स्थान मिळवले.

मोहम्मद शमी, दीपक चहर श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई या खेळाडूंना या संघात स्थान मिळालेले नसले तरी हे सर्व खेळाडू स्टँडबाय खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. पण काही स्टार खेळाडूना संघात स्थान मिळाले नाही.

आयपीएल ऑक्शन 2022 मध्ये इशान किशनला 15 कोटी रुपये मिळाले. परंतु आयपीएलमधील काही सामने सोडले तर त्याच्या सामन्यांमध्ये इशान किशनची बॅट शांत राहिली. आशिया चषक 2022 मध्येही इशान किशनचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला नव्हता. T20 विश्वचषक 2022 च्या संघात निवड न होणे हा इशान किशनसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांची T20 विश्वचषक 2022 साठी यष्टिरक्षक म्हणून निवड झाली आहे. त्याचवेळी संजू सॅमसनला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनची निवड न झाल्याने चाहते प्रचंड संतापले आहेत. संतप्त चाहते सोशल मीडियावर सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आशिया कप 2022 साठी देखील संजू सॅमसनची भारतीय संघात निवड झाली नव्हती, त्यानंतर बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु 2022 च्या आशिया कपमध्ये ऋषभ पंतची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.

आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही. मात्र या युवा फलंदाजाची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. आशिया चषक 2022 मध्येही श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. आशिया चषक 2022 मध्ये स्थान न मिळाल्यानंतर चाहत्यांना आशा होती की या युवा फलंदाजाला विश्वचषक संघात स्थान मिळेल. परंतु आता हा खेळाडू स्टँडबाय खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT