Team India T20 World Cup : भारताचे क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भुवनेश्वरकुमारच्या अखेरच्या षटकांतील गोलंदाजीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी धावांची लयलूट करीत आहेत. टीम इंडियासाठी टी-२० विश्वकरंडकाआधी ही डोकेदुखी ठरत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिल्या लढतीदरम्यान जास्त प्रमाणात दव नव्हते. गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक हात सुके करण्यासाठी टॉवेलचा वापरही करीत नव्हते. त्यामुळे या पराभवाला दवाला जबाबदार धरून चालणार नाही. भारतीय संघाने गोलंदाजी बरोबर केली नाही. ही सत्यस्थिती आहे, असे गावसकर या वेळी स्पष्टपणे म्हणाले.
भुवनेश्वरकुमारने पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया या तीन देशांविरुद्धच्या मागील तीन लढतींमध्ये धावाच धावा दिल्या आहेत. त्याने या तीन देशांविरुद्ध टाकलेल्या १८ चेंडूंमध्ये ४९ धावा दिल्या आहेत. त्याच्यासारख्या अनुभवी गोलंदाजाकडून अशी कामगिरी योग्य नव्हे.
बुमरा आल्यावर परिस्थिती बदलेल
जसप्रीत बुमरा याच्या खांद्यावर भारतीय गोलंदाजीची मदार आहे. दुखापतीमुळे तो बाहेर आहे. त्याचे संघात पुनरागमन झाल्यानंतर परिस्थिती बदलेल. तो सुरुवातीला विकेट घेतो, त्यामुळे धावसंख्येला ब्रेक लागतो. सध्या भारताला सुरुवातीला विकेट घेता येत नाहीत. कॅमरून ग्रीनने पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करीत कांगारूंच्या विजयाची पायाभरणी केली, असे गावसकर पुढे सांगतात.
रवी शास्त्री यांची क्षेत्ररक्षणावर टीका
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणावर टीका केली. ते म्हणाले, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारतीयांचे क्षेत्ररक्षण निराशाजनक होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.