Indias ODI World Cup 2023 Squad  
क्रीडा

India World Cup Squad : वर्ल्डकप संघात मुंबई इंडियन्सचा दबदबा! 'या' तीन फ्रँचायझीच्या एकाही खेळाडूला मिळाली नाही संधी

Kiran Mahanavar

Team India World Cup Squad 2023 : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 साठी भारताचा 15 सदस्यीय संघ एक महिना आधी जाहीर करण्यात आला. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी कर्णधार रोहित शर्मासह श्रीलंकेतील कॅंडी येथे पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा केली.

संघाची घोषणा होताच चाहत्यांमध्ये वेगळीच चर्चा पाहायला मिळाली. आयपीएलच्या कोणत्या संघाच्या खेळाडूला वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळाले. याबाबत चाहत्यांमध्ये सतत चर्चा होताना दिसली.

भारताच्या 15 खेळाडूच्या संघाकडे बघितले तर, इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी मुंबई इंडियन्स हे पाहायला मिळाले. रोहित शर्मा भारत आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्यांच्यासह मुंबई इंडियन्सच्या एकूण 4 खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. यात रोहितशिवाय ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाचा समावेश आहे.

आयपीएलच्या इतर संघांमधून निवडलेल्या खेळाडूंमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादव आणि अक्षर पटेल, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून विराट कोहली आणि मोहम्मद सिराज, तर गुजरात टायटन्सकडून हार्दिक पंड्या, शुभमन गिल आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

आयपीएलच्या 16व्या हंगामाचे विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघातून फक्त एका खेळाडूला स्थान मिळाले आहे, तो म्हणजे रवींद्र जडेजा. याशिवाय लखनऊ सुपर जायंट्स संघातील लोकेश राहुल विश्वचषक संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. तर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जच्या संघातील एकाही खेळाडूला भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय वर्ल्ड कप संघात स्थान मिळालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT